Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Air India New Logo: नवा रंग आणि लोगोसह एअर इंडियाचं रीब्रँडिंग

Air India New Logo: नवा रंग आणि लोगोसह एअर इंडियाचं रीब्रँडिंग

Subscribe

टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले की, नवीन लोगो अफाट शक्यता आणि आत्मविश्वास दर्शवतो त्यामुळे आता एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमान कंपनी बनवण्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला आहे.

नवी दिल्ली : एअर इंडियाने (Air India ) त्यांच्या नवीन लोगोचा भाग म्हणून लाल, पांढरा आणि जांभळा रंग कायम ठेवला आहे. नवीन लोगोचे नाव ‘द व्हिस्टा’ ( Vista) असे असून, एअरलाइनने त्यांचे नवीन टेल डिझाइन आणि थीम सॉंग देखील यावेळी सादर केले. टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले की, नवीन लोगो अफाट शक्यता आणि आत्मविश्वास दर्शवतो त्यामुळे आता एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमान कंपनी बनवण्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला आहे.

एअर इंडियाचा नवा लोगो हा एअरलाइनच्या नव्या ओळखीचा आणि रीब्रँडिंगचा भाग आहे. नवीन लोगो लाँच करताना टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की, एअर इंडिया हा आमच्यासाठी व्यवसाय नसून, टाटा समूहाची ही आवड आहे आणि ही आवड राष्ट्रीय मिशन आहे. पुढे ते म्हणाले की, एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमान कंपनी बनवण्याचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. तुम्ही पाहत असलेला नवीन लोगो… Vista या नावाने ओळखल्या जाणार असून, हा लोगो ऐतिहासिकदृष्ट्या अमर्याद शक्यता, प्रगती आणि आत्मविश्वास यांचे प्रतिनिधित्व करणार आहे. एअर इंडिया कंपनी टाटा समुहाकडे परत आल्यापासून एअर इंडियाला उभारी देण्यावर भर दिला जात आहे. नवीन लोगोमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगासह जांभळा रंग वापरण्यात आला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी हा नवीन लोगो लॉन्च केला.

- Advertisement -

हेही वाचा : आवाजी मतदानाने मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला 

15 महिन्यांपासून सुरू होते रीब्रॅंडींगचे काम

या लॉन्चिंगप्रसंगी एन. चंद्रशेखरन म्हणाले, टाटा समूह गेल्या १५ महिन्यांपासून एअर इंडिया कंपनीचा कायापालट करण्यावर काम करत आहे. तंत्रज्ञान, ग्राउंड हँडलिंग यावर आगामी काळात काम केले जाणार आहे. यासाठी आम्ही आमची सर्वोत्त टीम दिली आहे. तसेच आमच्या या विमान कंपनीने विमानांची संख्या वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स दिल्या आहेत. आम्ही तंत्रज्ञानावर सर्वाधिक भर देत आहोत आणि येत्या 9 ते 12 महिन्यांत आमच्याकडे सर्वोत्तम तंत्रज्ञान असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा : मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदी बोलत नसल्याने विरोधकांचा वॉकआऊट; राष्ट्रवादीचा एकच खासदार सभागृहात

डिसेंबरपासून दिसणार नवीन लोगो

नवीन ब्रँड जगभरातील प्रवाशांना सेवा देणारी जागतिक दर्जाची एअरलाइन बनण्याची एअर इंडियाची महत्त्वाकांक्षा आहे.असे एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले. नवीन लोगो फ्युचर ब्रँडच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. एअर इंडियाच्या प्रवाशांना डिसेंबर 2023 पासून विमानांवर नवीन लोगो दिसेल. एअर इंडियाचे पहिले Airbus A350 विमान नवीन लोगोसह त्यांच्या ताफ्यात सामील झाले आहे.

विमान दुरुस्तीसाठी 40 कोटीचा खर्च

नवीन लोगो लाँच करताना, सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, एअरलाइन एका परिवर्तनातून जात आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आमची सुरुवात चांगली झाली आहे. कार्यक्रमादरम्यान, त्यांनी असेही सांगितले की, आम्ही आमच्या विमानांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च केले आहेत. लोगो लाँच करण्याबरोबरच एअर इंडियासाठी एक नवीन वेबसाइट आणि एक नवीन मोबाइल अॅप देखील लॉन्च करण्यात आले. या वर्षाच्या अखेरीस नवीन ग्राहक सेवा सेटअप देखील स्थापित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -