घरताज्या घडामोडीAir India : एअर इंडियाची मालकी टाटांकडे, कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय, १० मुद्दे...

Air India : एअर इंडियाची मालकी टाटांकडे, कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय, १० मुद्दे वाचा

Subscribe

केंद्र सरकारने तोट्यात असेल्या एअरलाइन एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे दिली आहे. एअर इंडियासाठी टाटा समूहाने एकूण १८ हजार करोड रुपयांची बोली लावली होती. या टाटा समूहाला तब्बत ६८ वर्षानंतर एअर इंडियाची मालकी मिळाली आहे. केंद्र सरकारकडून एअर इंडियासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या यानुसार चार निविदा आल्या होत्या यामधील टाटा समूहाने सर्वोच्च बोली लावली होती यामुळे टाटा समूहाकडे एअर इंडियाची मालकी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने टाटांकडे मालकी देण्याचे निश्चित केलं आहे. एअर इंडियाचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आल्यापासून टाटा समूहाकडून प्रयत्न करत होते अखेर एअर इंडियावर टाटा समूहाने मालकी मिळवली आहे.

टाटा समूहाच्या टैलेस प्रायव्हेट लि.ने एकूण १८ हजार करोड रुपयांची बोली लावली होती. डिपार्टमेंट ऑफ इनवेस्टमेंट एंड पब्लिक एसेट मॅनेजमेंट (दीपम) सचिव तुहिन पांडे यांनी टाटा समूहाकडे एअर इंडिया सोपवण्यात आली असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने व्यवहारात काही प्रमुख १० गोष्टी सांगितल्या असून त्या खालील प्रमाणे आहेत.

- Advertisement -

१. कर्मचाऱ्यांच्या हिताची काळजी घेणार

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना पुर्ण अश्वासन देण्यात आले आहे की, टाटा सन्सकडे मालकी गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या हिताची काळजी घेण्यात येणार आहे.

२. वर्षभर कोणत्याही कर्मचाऱ्याला काढणार नाही

एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे गेल्यापासून १ वर्षभराच्या कालावधीत एकाही कर्मचाऱ्याला कामावरुन काढण्यात येणार नाही. तसेच एअर इंडियामध्ये मिळणाऱ्या सुविधा यापुढेही देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

३. वर्षभरानंतरची स्थिती काय असणार

टाटा समूहाला १ वर्षाच्या नंतर कर्मचाऱ्यांना काढण्याचा हक्क असेल अशी चर्चा केंद्र सरकार आणि टाटा सन्समध्ये झाली आहे. जर कोणत्या कर्मचाऱ्याला कामावरुन काढले तर त्याला स्वैच्छिक सेवानिवृत्त द्यावा लागेल असे केंद्र सरकारकडून सांगितले आहे.

४. कर्मचाऱ्यांना मेडिकल क्लेम

दीपम सचिव तुहिन पांडे यांनी म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटीमध्ये बदल करण्यात येणार नाही. तसेच सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या सुविधांचाही फायदा मिळत राहणार आहे.

५. एअर इंडियाकडील कर्मचारी

सध्या एअर इंडियामध्ये १२ हजार ०८५ कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये ८०८४ कर्मचारी स्थायी कर्मचारी आहेत. तर ४ हजार कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवर कामाला आहेत. एअर इंडियाजवळ इंडिया एक्सप्रेसचे १४३४ कर्मचारी आहेत.

६. टाटा समूहाकडून १८ कोटींची बोली

टाटा समूहाने एअर इंडियासाठी १८ हजार कोटींची बोली लावली होती. यामध्ये १५,३०० करोड रुपयांचे एअर इंडियावर कर्ज आहे आणि नगदी पैसे देण्यात येणार आहे.

७. एअर इंडियाचे सर्व अधिकार मिळणार

टाटा समूहाला एअर इंडियाची मालकी मिळाल्यावर विमानतळावर ४,४०० राष्ट्रीय आणि १८०० अंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅंडिंग आणि पार्किंगची परावनगी देण्यात आली आहे. तसेच एअर इंडियाच्या एविएशन सर्विस एक्सेप्रेसचाही कंट्रोल मिळणार आहे.

८. टाटा समूह परस्पर विक्री करु शकणार नाही

दीपम सचिवांनी म्हटलं आहे की, टाटा समूहने एअर इंडियावर टाटा समूहसह ८ जणांची मालकी असेल तसेच मालकी कोणत्याही गैर भारतीयांना विकूही शकणार नाही.

९. डिसेंबरपर्यंत पुर्ण होणार हस्तांतरण प्रक्रिया

दीपम सचिव तुहीन कांता पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे की डिसेंबरपर्यंत एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे.

१०. या कंपन्यांनी लावली होती बोली

एअर इंडियावर मालकी मिळवण्यासाठी टाटा समूहासह स्पाइसजेटच्या अजय सिंह यांनी बोली लावली होती. परंतु टाटा समूहाकडून अधिक रुपयांची बोली लावण्यात आली असल्यामुळे टाटांना मालकी देण्यात आली आहे. तसेच मंत्र्यांनीही एकमत करुन टाटांना मालकी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे टाटांना एअर इंडियाची तब्बल ६८ वर्षांनी मालकी मिळाली आहे.


हेही वाचा : Cruise Drug Case: जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान काय म्हणाला आर्यन खान?


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -