घरट्रेंडिंगAir Indiaच्या विमानात सापडलं वटवाघूळ, नेवर्कसाठी निघालेल्या विमानाला ३० मिनिटात करावं लागलं...

Air Indiaच्या विमानात सापडलं वटवाघूळ, नेवर्कसाठी निघालेल्या विमानाला ३० मिनिटात करावं लागलं लॅडिंग

Subscribe

विमान लॅड झाल्यानंतर वटवाघूळ विमानातून बाहेर काढण्यासाठी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले.

दिल्लीहून नेवर्कसाठी उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या (Air India) विमानाला अचानक ३० मिनिटांच्या आत पुन्हा विमानतळावर लँड होण्याचा प्रकार दिल्ली विमानतळावर घडला आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (IGI Airport) नेवर्कसाठी (Newark) उड्डाण भरलेल्या विमानात अचानक वटवाघूळ (Bat) आढळून आले. त्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली. हे विमान ठरलेल्या वेळात पहाटे २:२० वाजता विमानतळावरुन निघाले होते. विमान मध्यावर गेल्यावर विमानातील क्रू सदस्यांना कॅबिनमध्ये वटवाघूळ दिसले. याची कल्पना तात्काळ वैमानिकाला देण्यात आली. (Air India plane found Bat, Newark plane had to land in 30 minutes)

- Advertisement -

विमान उड्डाण भरुन केवळ ३० मिनिटे झाली असताना वैमानिकाने विमान तात्काळ मागे फिरवण्याचा निर्णय घेत संपूर्ण घटनेची माहिती दिल्ली विमानतळाला दिली. त्यानंतर एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी AI-105 DEL-EWR या विमानाला लोकल स्टँडबाय इमरजन्सी म्हणून घोषित केले. वैमानिकाने विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर लँड केले. विमान लॅड झाल्यानंतर वटवाघूळ विमानातून बाहेर काढण्यासाठी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांनी विमानात शोधाशोध केल्यानंतर त्यांना मृत अवस्थेतील वटवाघूळ दिसून आले. वन्यविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते वटवाघूळ ताब्यात घेतले. विमानातून वटवाघूळ बाहेर काढण्यासाठी धूर करण्यात आला होता. त्या धुरामुळे वटवाघळाचा मृत्यू झाला.

विमान कंपनीचे उड्डाण सुरक्षा विभाग या घटनेची सविस्तर चौकशी करणार आहेत. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कदाचित विमानात केटरींगसाठी वाहने लोड करताना वटवाघूळ विमानात शिरले असावे, असे त्यांनी सांगितले.  ही घटना घडल्यानंतर विमानातील प्रवाशांना एअर इंडिया फ्लाइट AI-105 ने नेवर्कला पाठवण्यात आले. सकाळी ११:३५ ला विमान नेवर्कला सुखरुप लँड झाले.

- Advertisement -

हेही वाचा – DGCA : विदेशात जाणाऱ्यांनो जरा थांबा, ३० जूनपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -