एअर इंडियाच्या विमानात पुन्हा समस्या; प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

मागील अनेक महिन्यांपासून एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक समस्या उद्भावत आहेत. सातत्याने येणाऱ्या या तात्रिंक समस्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आज पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

मागील अनेक महिन्यांपासून एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक समस्या उद्भावत आहेत. सातत्याने येणाऱ्या या तात्रिंक समस्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आज पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, दुबईहून तिरुवनंतपुरमला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानामध्ये लँडिंगवेळी काही तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर या विमानाच्या पायलटने एटीसीशी संपर्क साधत मदत मागितली. (Air India plane problems again Passenger safety at stake)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एअर इंडियाचे विमान दुबईहून तिरुवनंतपुरमसाठी निघाले होते. त्यावेळी या विमानाचे लँडिंग होत असताना अचानक विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. या परिस्थितीमुळे प्रवासी हैराण झाले. मात्र, त्याचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. हा प्रकार घडला तेव्हा विमानात 148 प्रवासी होते.

दरम्यान, या विमानाच्या लँडिंगवेळी पायलटला काही तांत्रिक समस्या जाणवल्याने त्याने एटीसीची मदत घेतली. त्यानंतर सकाळी 6.30 वाजता विमानाचे नियोजित वेळेनुसार लँडिंग करण्यात आले. दरम्यान, धावपट्टीवर उतरल्यानंतर, IX 540 एअर इंडिया एक्स्प्रेसची तपासणी करण्यात आली. त्यावेळी विमानाच्या पुढील चाकाचा वरचा भाग काढून टाकण्यात आला आहे.

एअर इंडियाची ८४० विमानांची जम्बो खरेदी

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने दिलेल्या विमान खरेदीच्या ऑर्डरची जगभरात चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात ही ऑर्डर ४७० विमानांची नसून ८४० विमानांची असल्याचे पुढे आले आहे. एअर इंडियाचे मुख्य अधिकारी निपुण अग्रवाल यांनी गुरुवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.

त्यानुसार एअर इंडियाने विमान उत्पादक कंपनी एअरबस आणि बोईंगला जी ऑर्डर दिली, त्यामध्ये आणखी ३७० विमाने खरेदी करण्याचा पर्याय समाविष्ट आहे. त्यामुळे ही ऑर्डर वाढून ८४० विमानांवर जाते. ही ऑर्डर भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी मैलाचा दगड असल्याचे अग्रवाल यांनी नमूद केले आहे.


हेही वाचा – गुजरातमध्ये जाणता राजा नाटकावेळी…, पुण्यातील दौऱ्यात अमित शाह आठवणीत रमले