घरताज्या घडामोडी'एअर इंडिया'ने ४८ वैमानिकांना दिला नारळ

‘एअर इंडिया’ने ४८ वैमानिकांना दिला नारळ

Subscribe

'एअर इंडिया'कंपनीने आपल्या ४८ वैमानिकांना सेवेतून बरखास्त केले आहे.

‘एअर इंडिया’कंपनीने आपल्या ४८ वैमानिकांना सेवेतून बरखास्त केले आहे. या वैमानिकांनी गेल्या वर्षी कंपनीला आपला राजीनामा कंपनीकडे सोपवला होता. परंतु, नियमानुसार सहा महिन्यांचा नोटीस कालावधी होता. या कालावधीत त्यांनी आपले राजीनामे परत घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार; एअर इंडियाने या वैमानिकांना राजीनामा परत घेण्यास स्वीकृती दर्शवली होती. परंतु, गुरुवारी अचानक स्वीकृती रद्द करण्यात आली. त्यासोबतच या ४८ वैमानिकांची सेवा १३ ऑग्सट २०२० पासून तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आली आहे.

सीएमडी आणि नागरी उड्डाण मंत्र्यांकडे तक्रार

विशेष बाब म्हणजे या वैमानिकांना कामावरुन काढून टाकले आहे. याबाबत कंपनीने त्यांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे ते नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाले. कामावर आल्यानंतर त्यांना ही बाब कळताच मोठा धक्का बसला. यासंदर्भात वैमानिक युनियनने सीएमडी आणि नागरी उड्डाण मंत्र्यांकडे तक्रार करणारे एक पत्रही पाठवले आहे.

- Advertisement -

खर्च कमी करण्यासाठी निवडला मार्ग

कोरोनाच्या काळात एअर इंडिया कंपनीला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय पाच वर्षांच्या सुट्टीवर देखील पाठवण्यात आले आहे. तसेच खर्च कमी करण्यासाठी अनेक मार्ग स्विकारण्यात आले आहेत. त्यातील एक मार्ग म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणे. – राजीव बन्सल; एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

बेकायदेशीरपणे वैमानिकांना सेवेतून केले बडतर्फ

एअर इंडियानं बेकायदेशीरपणे वैमानिकांना सेवेतून बडतर्फ केल्याचे ‘इंडियन कमर्शिअल पायलटस असोसिएशन’ने (ICPA) म्हटले आहे. प्रशासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी आयसीपीएकडून करण्यात आली आहे. कोरोना संकट काळात देशाची सेवा करणाऱ्यांना अशा पद्धतीने बडतर्फ करणे, ही एक धक्कादायक गोष्ट असल्याचेही आयसीपीएने म्हटले आहे. याविषयी आयसीपीएकडून शुक्रवारी एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव बन्सल यांना एक पत्रही पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: देशात कोरोनाचा उद्रेक! २४ तासांत ६५ हजार नव्या रुग्णांची नोंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -