Air India Flight : नवी दिल्लीहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान (Air India Flight) गुरुवारी (14 सप्टेंबर) सकाळी तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत (Pakistans airspace) घुसले, पण त्यानंतर विमानाने यू-टर्न घेत पुन्हा नव्वी दिल्लीत (New Delhi) परतले. विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत का घुसले याबाबत एअर इंडियाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. (Air India The flight from Delhi to London suddenly reached Pakistans airspace and)
हेही वाचा – पृथ्वीच्या इलेक्ट्रॉन्सपासून चंद्रावर तयार होतंय पाणी; Chandrayaan-1च्या डेटामधून खुलासा
एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI 111 ने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 7.15 च्या सुमारास उड्डाण केले. टेकऑफ केल्यानंतर अवघ्या अर्धा तासांत विमानात काही तांत्रिक बिघाड झाला आणि बिकानेरजवळ हे विमान 36 हजार फूट उंचीवरून 32 हजार फुटांवर पोहोचत पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसले. यानंतर विमानाने यू-टर्न घेतला आणि नवी दिल्लीला परतण्याची प्रक्रिया सुरू केली.
Hundreds of passengers are being stranded on the airport because of the poor service of @airindia . There was technical glitch in the flight today(AI0111) as the AC was not working and other issues were also there. Pilot was having an experiment in the air.
— YASHVARDHAN TRIKHA (@YASHVARDHANTRI3) September 14, 2023
सकाळी 9.30 च्या सुमारास विमान IGI विमानतळावर यशस्वीरित्या उतरले. इंटरनेट मीडियावर, यशवर्धन त्रिखा नावाच्या व्यक्तीने ट्वीट करत म्हटले की, एअर इंडियाच्या निकृष्ट सेवेमुळे शेकडो प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. आज (AI0111) फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. कारण एसी काम करत नव्हता आणि इतर समस्याही होत्या. पायलट हवेत एक प्रयोग करत होते, असा मिश्किल टोलाही या प्रवासाने लगावला आहे.
आणखी एका प्रवाशाने विमान उशीर झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना मागणी केली की, त्याच्या आईला लंडनहून कॅनडाला कनेक्टिंग फ्लाइट घ्यावी लागली. कारण उशीर झाल्यामुळे कनेक्टिंग फ्लाइट आता चुकण्याची भीती आहे. दरम्यान, एअर इंडियाने या प्रवासाला उत्तर देताना म्हटले की, ऑपरेशनल कारणांमुळे विमानाला उशीर होत आहे.
हेही वाचा – न्यायालयाचे निर्णय राजकारणाच्या दृष्टीने..; नक्षलवादी गौतम नवलखा केसबद्दल निवृत्त न्यायाधीशांचा खुलासा
एअर इंडिया विमानात तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच
दरम्यान, चार दिवसांपूर्वी बंगळुरू ते सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे एअर इंडिया 175 विमान उड्डाणानंतर काही तांत्रिक बिघाडामुळे अलास्काच्या दिशेने वळवण्यात आले होते. तब्बल चार तासांनंतर या विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर विमानाने पुन्हा सॅन फ्रान्सिस्कोच्या दिशेने उड्डाण केले होते. यापूर्वी 29 एप्रिल रोजीही खराब वातावरणामुळे सिंगापूरला जाणारे एअर इंडियाच्या विमानाने मार्ग वळविला होता. तसेच एअर इंडियाटे विमान AI346 हे देखील मलेशियाच्या दिशेने वळविले होते. हवामानात सुधारणा झाल्यानंतर विमानाने पुन्हा उड्डाण केले होते.