Homeदेश-विदेशAir India : हात ठेवण्याच्या जागेवरून एअर इंडियात प्रवाशांमध्ये राडा; नेमकं काय...

Air India : हात ठेवण्याच्या जागेवरून एअर इंडियात प्रवाशांमध्ये राडा; नेमकं काय घडलं?

Subscribe

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय विमानात झालेल्या वादाच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना नुकतेच डेन्मार्कच्या कोपनहेगनहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात घडली. या विमानात प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांमध्ये रविवारी (23 डिसेंबर) हात ठेवण्याच्या जागेवरून वाद झाल्याचे समोर आले. त्यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला होता. (Air India two passengers trade blows over armrest on Delhi)

हेही वाचा : Crime : निझामपूरमध्ये लज्जास्पद घटना, वृद्धेवरील अत्याचाराविरोधात मोर्चा, युवकाला फाशी देण्याची मागणी 

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (22 डिसेंबर) कोपनहेगन – दिल्ली विमानामधील प्रवाशांमध्ये काही मुद्द्यावरून वाद झाला होता, जो नंतर सोडवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचे उड्डाण झाल्यानंतर काही वेळातच इकॉनॉमी क्लासमध्ये हात ठेवण्याच्या जागेवरून दोन प्रवाशांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचे रुपांतर त्यानंतर हाणामारीत झाले. केबिन क्रूने मध्यस्ती करत एका प्रवाशाला शांत करून दुसऱ्या जागेवर बसवले.

पण, दिल्लीत विमान उतरत असताना दुसरीकडे बसवलेला प्रवासी आपल्या समान घेण्यासाठी गेला असता पुन्हा एकदा वाद सुरू झाली आणि या दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. दरम्यान या घटनेबाबत एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, AI 158 (कोपनहेगन-दिल्ली) द्वारे संचालित बोईंग 787-8 विमानामधील प्रवाशांची संख्या माहित नव्हती. पण, विमान जवळपास भरले असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात एअर इंडियाच्या अधिकाऱ्यानी माहिती दिली की, दोन प्रवाशांमध्ये काही मुद्द्यावरून वाद झाला होता. मात्र काही वेळाने ते सामंजस्याने सोडवण्यात आले. विमानतळावरून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलनही केले.” असा दावा त्यांनी केला.


Edited by Abhijeet Jadhav