एअर इंडिगोची देशभरात तब्बल 900 उड्डाणे उशिरा, DGCAने मागितला खुलासा

एअर इंडिगोची देशभरात तब्बल 900 उड्डाणे उशिरा झाली. याबाबत DGCAने खुलासा मागितला आहे.

air indigo

एअर इंडिगोचा घोळ आजूनही संपलेला नाही. या कंपनी बाबत अनेक तक्रारी येत असतात. आज चक्का स्टाफ उपलब्ध नसल्याने देशभरातील प्रवासी विमान खोळंबली आहेत. या घोळामुळे प्रवाशी संपापल्याचे दिसले. कंपनीकडे पुरेसा स्टाफच नसल्याने पुढे काय होणार? असा प्रश्न अनेक प्रवाशी विचारत होते. केबिन क्रू आणि कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे शनिवारी देशभरातील तब्बल 900 इंडिगोची उड्डाणे उशीरा झाली, अशी माहिती एका इंग्रजी वेबसाईटने दिली. एअरलाईनला रविवारीही कर्मचाऱ्यांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला, असेही त्यात म्हटले आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोच्या विरोधात कठोर दखल घेतली आहे आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर उड्डाण विलंब होण्यामागे स्पष्टीकरण मागितले आहे, DGCA अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

इंडिगो ही देशातील आघाडीची विमान कंपनी आहे. ज्याचे भारतात चांगले नेटवर्क आहे. एका आकडेवारीनुसार इंडिगोची देशात दररोज 1600 पेक्षा जास्त उड्डाणे होतात. ज्यामध्ये लोक मोठ्या संख्येने प्रवास करतात. खरे तर, इंडिगो ही देशातील एक बजेट एअरलाइन म्हणून ओळखली जाते. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या प्रवाशांना प्रवास करणे आवडते. शनिवारी अनेक विमानांच्या उड्डाणाला उशीर झाल्याने इंडिगोच्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय उड्डयन मंत्रालयाने इंडिगोच्या उड्डाणांना होणार्‍या विलंबाबाबत माहितीही शेअर केली आहे. ज्या अंतर्गत शनिवारी इंडिगोची केवळ 45 टक्के उड्डाणे वेळेवर चालवण्यात आली. मोठ्या संख्येने क्रू मेंबर्सनी आजारी रजा घेतली होती.