घरताज्या घडामोडीDelhi Air Pollution : दिल्लीत वाढत्या प्रदूषणाचा कहर, कोणत्या राज्यात काय स्थिती?

Delhi Air Pollution : दिल्लीत वाढत्या प्रदूषणाचा कहर, कोणत्या राज्यात काय स्थिती?

Subscribe

दिल्ली-एनसीआरमध्ये मागील काही दिवसांपासून हवेच्या प्रदुषणात वाढ होताना दिसत आहे. दिल्लीतील खराब हवेमुळे येथील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता पाहिली असता सर्वात खराब श्रेणीमध्ये आहे. दिल्लीतील एक्यूआयची २९० इतकी नोंद करण्यात आल्याची माहिती सिस्टम ऑफ एयर क्वॉलिटी अँण्ड वेदर फोरकास्टिंग अँण्ड रिसर्च (SAFAR) यांनी दिली आहे.

SAFAR यांच्या माहितीनुसार, नोएडामध्ये हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात खराब आहे. येथील एक्यूआय २९३ इतकी नोंद करण्यात आली आहे. त गुरूग्राममध्ये एक्यूआय २२५ इतकी असून हवा अशुद्ध असल्याची माहिती मिळते. दिल्लीसोबत जवळच्या इतर राज्यांमध्येही प्रदुषणाने थैमान घातलं आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ मध्ये कडक ठंडी पडली आहे. शहरात ठंडी व्यतिरिक्त वायू प्रदूषणापासून मोठा दिलासा मिळत आहे. मागील आठवड्यातील येथील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. परंतु पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हवेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय देशातील अनेक राज्यांत एक्यूआय खराब होण्याची शक्यता आहे.

बिहारमधील तापमान जवळपास १० अंशाच्या बरोबरीने आहे. परंतु हेच तापमान २२ ते २५ च्या मध्ये वाढण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये देखील ठंडीचा प्रकोप वाढत आहे. एक्यूआयच्या आकड्यांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

- Advertisement -

सततच्या खराब हवामानामुळे हिवाळीच्या मोसमात हवेचा प्रवाह थांबतो. तसेच एका जागी हवा थांबल्यामुळे हवेत जाडपणा तयार होतो. त्यामुळे एक्यूआय वाढतो. साधारणपणे हवेची शुद्धता AQI द्वारे मोजली जाते.

दिल्लीतील १२ वी पर्यंतच्या शाळांना सुरूवात झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाचा कहर होत असल्यामुळे येथील शाळा ३ डिसेंबर बंद करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे ओमिक्रॉनचा धोका सुद्धा दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे.


हेही वाचा : Omicron Variant : ओमिक्रॉनची दहशत! इस्राईलने अनेक देशांना केले रेड लिस्ट, तर अमेरिकन प्रवासावर बंदीची शक्यता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -