घरताज्या घडामोडीDelhi करांचा श्वास कोंडला, प्रदूषणात वाढ ; देशात ५०० कोटींच्या वर वाढली...

Delhi करांचा श्वास कोंडला, प्रदूषणात वाढ ; देशात ५०० कोटींच्या वर वाढली एअर प्युरीफायरची डिमांड

Subscribe

एअर प्युरीफायर कंपनी नवीन मॉडेल सादर करणार

नवी दिल्ली : दिल्ली आणि आसपासच्या परिसरात प्रदूषणामध्ये भयंकर वाढ झाली आहे. येथील परिस्थिती पाहिली असता, नागरिकांना सुद्धा मोकळा श्वास घेण्यास त्रास होत आहे. परंतु हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी देशात एअर प्युरीफायरची डिमांड वाढली आहे. मागील वर्षातील दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे एअर प्युरीफायरची डिमांड वाढली होती. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षात एअर प्युरीफायरची बाजारात मागणी वाढली आहे. देशात ५०० कोटींच्या वर एअर प्युरीफायरचा व्यवसाय वाढला आहे. दिल्ली आणि एनसीआरसह उत्तर भारताचा एअर प्युरीफायरच्या उत्पादनात मोठा सहभाग आहे.

या हंगामात एअर प्युरीफायर कंपनी नवीन मॉडेल सादर करणार आहे. प्रदूषित हवामानामुळे सीओवी-२ व्हायरसचा धोका उद्भवू शकतो. युरेका फोर्ब्सचे प्रबंध निदेशक आणि मुख्य कार्यपालक अधिकारी मार्जिन आर श्रॉफने सांगितलं की, २०२१ मध्ये कंपनीचं नवीन मॉडेल सादर केलं जाणार असून त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशभरात हजारो कुटुंबियांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मागील वर्षात झालेली कंपनीची एकूण विक्री पाहिली असता ३० टक्क्यांची वाढ झालीये. कॅट आरओचे संस्थापक आणि चेअरमन महेश गुप्ता यांनी सांगितलंय की, कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात मोठी विक्री केली आहे. विक्रीत वाढ झाली असून थंडी आणि सर्दीचा हंगाम येईपर्यंत ही विक्रीत अशीच सुरू राहणार आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, पहिल्यांदा केन्ट एअर प्यूरीफायरची विक्री ७० टक्के एवढी होत होती. दिल्ली एनसीआरमध्ये ही विक्री मोठ्या प्रमाणात होती. परंतु यंदाच्या वर्षात एअर प्युरीफायरची मागणी अनेक शहरांमध्ये वाढली आहे. दिल्लीत वायू प्रदूषणामुळे भीषण परिस्थिती निर्माण झालीये. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने शनिवारी एका आठवड्यासाठी शाळा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा: CBI आणि ED प्रमुखांच्या कार्यकाळासाठी मोदी सरकारकडून वाढ, काँग्रेसने साधला निशाणा


दिल्लीत लॉकडाऊनची वेळ

राजधानी दिल्लीत वाढलेल्या प्रदूषणामुळे संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका आठवड्यासाठी शाळा बंद केल्या आहेत. तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्यास सांगितलं आहे. प्रदूषणाच्या मुद्यावर दिल्ली सरकारने महत्त्वाची बैठक घेतली. यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून लॉकडाऊनवरही विचारविनिमय करण्यात येत असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

जगातील १० प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा पहिला नंबर

स्वित्झर्लंड स्थित हवामान समूह IQAIR ने नवीन यादी जारी केली आहे. यामध्ये हवेची गुणवत्ता आणि प्रदूषित शहरांची नावे समोर आली आहेत. जगातील १० प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा पहिला नंबर लागतो. तर देशातील मुंबई आणि कोलकाता या दोन प्रमुख शहरांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -