घरदेश-विदेशआज दिल्ली हारी, कल मुंबई की बारी!

आज दिल्ली हारी, कल मुंबई की बारी!

Subscribe

दिल्लीमध्ये प्रदूषणात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसापासून दिल्लीमध्ये हवेचा दर्जा घसरला आहे. येत्या काही दिवसामध्ये दिल्लीत आणखी हवेचा दर्जा घसरण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हिवाळा सुरु होण्याआधीच दिल्ली आणि मुंबईतील प्रदूषणाची पातळी वेगाने वाढत आहे. दिल्लीमध्ये हवेचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. त्यामुळे दिल्लीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या हवेचा दर्जा जर घसरत गेला तर दिल्लीकरांना श्वसनाला त्रास होणार आहे. एकतर दिल्लीकरांची आताच गर्मीपासून सुटका होऊन थंडी सुरु झाली होती. त्यातच आता दिल्लीमध्ये हवेचा दर्जा घसरल्याने दिल्ली सरकार देखील सतर्क झाले आहेत. सरकारने आपत्तकालीन परिस्थिती समजून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या प्रदूषणानंतर मुंबईत देखील तिच परिस्थिती पहायला मिळत आहे. मुंबईतदेखील दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चालले आहे.

- Advertisement -

यामुळे हवेचा दर्जा घसरला

पंजाब, हरियाणामध्ये या महिन्यामध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळले जातात. पंजाब आणि हरियाणामध्ये गेल्या १० दिवसामध्ये अमृतसर, अम्बाला, करनाल, सिरसा आणि हिसारमध्ये पराली जाळण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळेच दिल्लीतील हवेचा दर्जा घसरला आहे. दिल्लीमध्ये हवा प्रदूषित होत असल्याने आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रदूषीत हवेला दुरुस्त करण्यासाठी सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत. दिल्ली सरकारने हवेचा दर्जा तपासणीसाठी फोरकास्ट प्रणाली लॉन्च केली आहे. ही प्रणाली येत्या ३ दिवसामध्ये हवा कशी असणार याचा पूर्वानुमान लावू शकते. यामध्ये दिल्ली व्यतिरिक्त गुरुग्राम, गाजियाबाद आणि रोहतकची हवा देखील तपासली जाणार आहे.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना

दिल्लीच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. येत्या काही दिवसात दिल्लीची हवा आणखी खराब होऊ शकते अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या ४१ टीमला दिल्ली-एनसीआरमधल्या परिस्थितीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत बदलपूर पावर हाऊस बंद ठेवण्यात आला आहे. मशिनची साफसफाई आणि पाणी शिंपडण्याचे निर्देश दिले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत ४२७ सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस सेवत आणल्या जाणार आहेत. रस्त्यांची सफाई करणाऱ्या गाड्यांची सख्या ५२ वरुन ६४ करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये देखील दिल्लीसारखी परिस्थिती?

दिल्ली पाठोपाठ मुंबईतही तिच परिस्थिती पहायला मिळत आहे. मुंबईमध्ये देखिल दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चालले आहे. वाहनांची संख्या,बांधकामाची कामे, औद्याोगिकरणामुळे मुंबईतील प्रदूषण वाढत आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीमध्ये मुंबईत मोठ्याप्रमाणात फटाके फोडले जातात त्यामुळे याकाळात मुंबईत प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. अशामध्ये मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन यावर लवकरात लवकर पाऊल उचलली तर मुंबईत दिवाळीसण प्रदूषणमुक्त जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -