घरदेश-विदेशदेशांतर्गत विमानसेवेत ३० टक्के दरवाढीचे संकेत

देशांतर्गत विमानसेवेत ३० टक्के दरवाढीचे संकेत

Subscribe

किमान 400 रुपये ते कमाल 3000 रुपये अधिक मोजावे लागणार

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर देशांतर्गत विमानसेवेतही दरवाढ झाली आहे. लॉकडाऊन शिथील होताच देशांतर्गत विमानसेवा सुरु झाल्याने हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. केंद्राच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान कंपन्यांना वाहतूकीचे दर 30 टक्क्यांपर्यंत वाढवले, तर 80 टक्क्यांपर्यंत प्रवासी वाहतूकीस परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे हवाई वाहतूकीच्या किमान भाड्यात 10 टक्के, तर कमाल भाड्यात 30 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येताच अनलॉक करण्यात आले. मे 2020 मध्ये देशांतर्गत उड्डाणे सुरु झाली. त्यावेळी तिकिटांचा दर जवळचा प्रवास आणि लांबच्या प्रवासाच्या वर्गवारीनुसार निश्चित करण्यात आला. प्रवासाला लागणाऱ्या कालावधीनुसार 7 हवाई मार्गाची विभागणी केली असून, या प्रत्येक मार्गासाठी किमान आणि कमाल भाडे ठरवण्यात आले होते. याच प्रवर्गात आता केंद्राने किमान 10 आणि कमाल 30 टक्क्यांची वाढ केली. इकोनॉमी क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई ते दिल्ली मार्गासाठी किमान 400, तर कमाल 3 हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहे.

- Advertisement -

नव्या दरात या बाबींचा असणार समावेश

पूर्वी मुंबई ते दिल्ली या मार्गावर 3 हजार 500 रुपये किमान भाड्यात आता 3 हजार 900 रुपयांपर्यंत, तर 10 हजार रुपये कमाल भाड्यात 13 हजार रुपयांपर्यंत अशी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, या नव्या दरात विमानतळाचा युजर्स डेव्हलप्मेंट शुल्क पॅसेंजर सिक्यूरीटी शुल्क (देशांतर्गत प्रवासासाठी 150 रुपये), GST चा यामध्ये समावेश आहे.

सात प्रवर्गातील दरवाढ

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या या सवलतीनुसार,40 मिनिटांच्या विमान प्रवासासाठी तिकिट किमतींवर 2 हजार ते 6 हजारांची मर्यादा ठेवली आहे. 40 ते 60 मिनिटांच्या विमान प्रवासाच्या तिकिटांना अडीच ते साडेसात हजार, 60 ते 90 मिनिटांच्या प्रवासासाठी 3 हजार ते 9 हजार रुपये, 90-120 मिनिटांसाठी साडेतीन ते 10 हजार रुपये, 120-150 मिनिटांसाठी साडेचार ते 13 हजार रुपये, 150 ते 180 मिनिटांसाठी साडेपाच हजार ते 15 हजार 700 रुपये आणि 180-210 मिनिटांच्या विमान प्रवासाच्या तिकिट दरांवर साडेसहा ते 18 हजार 600 रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला सादर होणार – अजित पवार


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -