Homeदेश-विदेशAir travel rules : नवीन वर्षात विमानप्रवास करत असाल तर, हा नवीन...

Air travel rules : नवीन वर्षात विमानप्रवास करत असाल तर, हा नवीन नियम जाणून घ्या!

Subscribe

विमानप्रवासात सोबत ठेवण्याच्या बॅगेचे आकारमानही निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, केबिन बॅगची उंची 55 सेमी, लांबी 40 सेमी आणि रुंदी 20 सेमीपेक्षा जास्त नसावी. मात्र, बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठी 7 किलोऐवजी 10 किलो वजनाची मर्यादा असेल.

(Air travel rules) नवी दिल्ली : नवीन वर्षात अनेक संकल्प होत असतात. काहीजण पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात. अशावेळी ट्रेन आणि बसेसची गर्दी टाळण्यासाठी बहुतेक जण विमानाने प्रवास करतात. पण विमानातून प्रवास करण्यापूर्वी एका नियमात बदल झाल्याचे जाणूनही घ्या. अन्यथा विमानतळावर पोहोचल्यावर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. (Changes in rules regarding air travel bags)

नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (BCAS) हँड बॅगविषयक धोरणात बदल केला आहे. नव्या हँडबॅग धोरणानुसार विमान कंपन्याही आपल्या प्रवाशांबाबत कडक भूमिका घेणार आहेत. या नवीन नियमांनुसार आता प्रवाशांना फ्लाइटमध्ये फक्त एकच बॅग जवळ बाळगता येईल. हा नियम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही विमानसेवांसाठी लागू होईल. फ्लाइटच्या प्रीमियम किंवा इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणारे प्रवासी 7 किलो वजनाची फक्त एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकतील.

हेही वाचा – SS UBT Vs Mahayuti : दोन्ही खून सरकार पुरस्कृत असल्याने…, ठाकरे गटाचे सरकारवर टीकास्त्र

एवढेच नव्हे तर, सोबत ठेवण्याच्या बॅगेचे आकारमानही निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, केबिन बॅगची उंची 55 सेमी, लांबी 40 सेमी आणि रुंदी 20 सेमीपेक्षा जास्त नसावी. मात्र, बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठी 7 किलोऐवजी 10 किलो वजनाची मर्यादा असेल.

यांना मिळणार नियमातून सवलत

ज्या प्रवाशांनी 2 मे 2024पूर्वी तिकीट बुक केले आहे, त्यांना या नवीन हँडबॅग नियमातून सूट दिली जाईल. या प्रवाशांना इकॉनॉमीमध्ये 8 किलो, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 10 किलो आणि बिझनेस क्लासमध्ये 12 किलो वजनापर्यंत बॅग जवळ बाळगण्याची मुभा देण्यात आली. तथापि, 2 मे 2024नंतर केलेल्या कोणत्याही बुकिंगसाठी हे नवीन हँड बॅग नियम लागू असतली आणि अतिरिक्त वजनासाठी जादा पैसे मोजावे लागू शकतात. कोरोना महामारीनंतर विमानसेवा काहीप्रमाणत सुरू झाल्यावर विमानातील लगेजसंदर्भातील नियम शिथिल करून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा दिला होता. त्यानंतर हे नियम पुन्हा अंमलात आणण्यात आले, हे उल्लेखनीय. (Air travel rules: Changes in rules regarding air travel bags)

हेही वाचा – Sanjay Raut : जोपर्यंत अटलजींकडे भाजपाचे नेतृत्व…, काय म्हणाले राऊत?


Edited by Manoj S. Joshi