घर देश-विदेश तांत्रिक अडचणीमुळे लंडनच्या विमान प्रवासावर परिणाम; थांबविण्यात आली उड्डाणे, वाचा- काय आहे कारण

तांत्रिक अडचणीमुळे लंडनच्या विमान प्रवासावर परिणाम; थांबविण्यात आली उड्डाणे, वाचा- काय आहे कारण

Subscribe

ब्रिटनच्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीकोणाने विमानांची उड्डाणे थांबविण्यात आली आहेत. यामुळे हवाई सेवा प्रभावित झाली असून, प्रवाशांना या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

ब्रिटन :  लंडनमध्ये सोमवारी तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने विमानसेवा प्रभावित झाली आहे. यामुळे लंडनमधील विमानतळावर विमानसेवा बंद करण्यात आली. ब्रिटनच्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेने तांत्रिक समस्येमुळे उड्डाणे थांबविण्यात आल्याची माहिती दिली आहे. ब्रिटनच्या हवाई वाहतूक सेवेने सांगितले की, आमचे इंजिनिअर समस्येचे सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ही समस्या लवकरच निकाली काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.(Air travel to London affected by technical difficulties; Canceled flights, read- what is the reason)

ब्रिटनच्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीकोणाने विमानांची उड्डाणे थांबविण्यात आली आहेत. यामुळे हवाई सेवा प्रभावित झाली असून, प्रवाशांना या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही परिणाम

- Advertisement -

स्कॉटिश एअरलाइन लोगनायरने ब्रिटनच्या हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीमध्ये नेटवर्क समस्या नोंदवली आहे. असे असले तरी देशांतर्गत उड्डाणांवर परिणाम होणार नाही अशी माहीती त्यांनी दिली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणे प्रभावित होऊ शकणार असून, उड्डाणाला उशिर लागू शकतो असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : चंद्रानंतर आता सूर्यावर लक्ष… Aditya-L1 झेपवणार अंतराळात; ISROने जाहीर केली तारीख

संपर्कात राहण्याचे केले आवाहन

- Advertisement -

इसीजेट (Easyjet) या हवाई वाहतूक कंपनीकडून प्रवाशांना सांगण्यात आले की, ही समस्या सध्या युनायटेड किंगडम (UK) मधील अंतर्गंत आणि बाहेर जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सवर परिणाम करत आहे. कंपनीने म्हटले आहे की, सध्या युनायटेड किंगडमच्या हवाई क्षेत्रात किंवा बाहेर जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सवर परिणाम करणाऱ्या हवाई वाहतूक नियंत्रणाच्या समस्येबद्दल माहिती मिळाली आहे. या समस्येचा परिणाम आणि सामान्य कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठीची कालमर्यादा समजून घेण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत अशीही माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा :चंद्रावर चालता-चालता रोव्हरच्या वाटेत आला खड्डा; वाट बदलून ‘प्रज्ञान’ पुन्हा ध्येयाच्या दिशेने

याआधी अमेरिकेत घडला होता असा प्रकार

ब्रिटेनमधील आजच्या घडलेल्या प्रकाराआधी याच वर्षी जानेवारी महिन्यांत संगणकात आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अमेरिकेतही सर्व प्रकारच्या विमान उड्डाणे थांबविण्यात आली होती. यामुळे अमेरिकेतील हजारो प्रकारचे उड्डाणांवर परिणाम होऊन प्रवाशांना मोठ्या मानसिक ताणाला सामोरे जावे लागले होते.

बसला होता कोट्यवधीचा फटका

अमेरिकेत थांबविण्यात आलेल्या विमान उड्डाणांचा परिणाम तब्बल चार हजाराहून अधिक विमान उड्डाणांवर झाला होता. 450 देशी तर असंख्य आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले होते. यामध्ये अमेरिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला होता.

- Advertisment -