विमान कंपनीचा ‘मेगा सेल’, ९९९ रुपयांत तिकीट

एअर एशिया या विमान कंपनीने 'मेगा सेल' अंतर्गत, ग्राहकांना विमान प्रवासावर भरघोस सूट दिली आहे.

airasia mega sale offer
एअर एशियाचा मेगा सेल (फोटो सौजन्य-aviationvoice.com)

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअर लाईन कंपन्या नेहमीच नवनवीन ऑफर्स आणि तिकीटांवर भरघोस सूट देत असतात. याच धर्तीवर एअर एशिया या विमान कंपनीने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही केवळ ९९९ रूपयांत विमानाचं तिकीट बुक करु शकणार आहात. ही ऑफर देशांतर्गत वाहतुकीसाठी मर्यादित असून नवी दिल्ली, बंगळुरु, गोवा, अमृतसर, कोची आणि कोलकातासह अन्य काही प्रमुख शहरांमध्ये तुम्ही प्रवास करु शकता. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासठी तुम्हाला ७ ऑक्टोबरच्या आतच तुमचं तिकीट बुक करावं लागेल. दरम्यान एकदा तिकीट बुक केल्यानंतर जर तुम्ही के रद्द करत असाल, तर मात्र तुम्हाला रिफंड मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही या ऑफरचा लाभ घ्यायच्या विचारात असाल तर तिकीट बुकींगसाठी तुमच्याकडे केवळ २ दिवस शिल्लक आहेत.

इंडिगो कंपनीचीही भन्नाट ऑफर

इंडिगो एअरलाईन्सने अवघ्या ९९९ रुपयांत विमान प्रवास करण्याची संधी लोकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. १० लाख विमान तिकीटांच्या विक्रीसाठी इंडिगोने हा खास ‘सेल’ जारी केला आहे. या विशेष ऑफरमध्ये विमान तिकीटांची किंमत केवळ ९९९ रुपयांपासून सुरु होत आहे. जर तुम्ही इंडिगोने देशांतर्गत प्रवास करणार असाल तर तिकीटांची किंमत ९९९ रुपयांपासून आणि आंतराष्ट्रीय प्रवासाच्या तिकीटांची किंमत ३ हजार १९९ रुपयांपासून सुरु होत आहे. दरम्यान ही सवलतीची ऑफर १८ सप्टेंबर २०१८ ते ३० मार्च २०१९ या मर्यादित काळासाठीच असेल. मोबिक्विक या अॅपद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना २० टक्के (जास्तीत जास्त ६०० रुपयांपर्यंत) कॅशबॅक मिळणार आहे.


वाचा: लोकल ट्रेनवर अज्ञातांची दगडफेक, महिला प्रवासी जखमी