घरदेश-विदेशCoronaEffect: 'या' प्रसिद्ध कंपनीने १९०० कर्मचाऱ्यांची केली कपात!

CoronaEffect: ‘या’ प्रसिद्ध कंपनीने १९०० कर्मचाऱ्यांची केली कपात!

Subscribe

२५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात म्हणजे साधारण १९०० कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी कोरोनामुळे गमवावी लागणार आहे.

जगभरात कोरोनाचा फैलाव होत असताना कोरोनामुळे जगभरातील अनेक व्यवसायांना फटका बसला आहे. कोरोनामुळे विविध व्यवसाय ठप्प झाल्याने अनेक आर्थिक संकटांना सोमोरे जावे लागत आहे. दरम्यान हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी निगडीत Airbnb Inc कंपनीने त्यांच्या २५ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कपात केल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात म्हणजे साधारण १९०० कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी कोरोनामुळे गमवावी लागणार आहे. Airbnb Inc ही एक रेंटल स्टार्टअप्समधील नावाजलेली कंपनी असून केवळ कोरोना व्हायरसमुळे त्यांना त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांची कपात केल्याची नोटीस कंपनीचे संस्थापक ब्रायन चेस्की यांनी कर्मचाऱ्यांना दिली.

- Advertisement -

Reuters वृत्तसंस्थेने देखील यासंदर्भातील माहिती दिली होती तर ब्रायन चेस्की यांनी त्यांच्या ट्विटरवर देखील यासंदर्भात ट्वीट करत त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेला मेमो देखील यावेळी शेअर केला आहे.

- Advertisement -

हा मेमो शेअर करताना त्यांनी असे म्हटले की, ‘आमच्या कंपनीतून खूप चांगली माणसं सोडून जात आहेत, आणि माझ्या मते इतर कंपन्या देखील त्यांना माझ्याइतकंच प्रेम देतील.’ तसेच ‘Airbnb Inc सध्या खूप कठीण प्रसंगातून जात आहे. या वर्षी जेवढी कमाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ती २०१९ च्या कमाईच्या अर्धी देखील नाही आहे.’ असे ब्रायन यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

कंपनीकडून १४ आठवड्यांचा बेसिक पे मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ७ हजार ५०० इतकी होती. मात्र आता साधारण १९०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या कंपनीतील अमेरिका आणि कॅनडामधून काढण्यात येणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा ११ मे हा शेवटचा दिवस असेल. ज्यांना काढून टाकण्यात आले आहे त्यांना कंपनीकडून १४ आठवड्यांचा बेसिक पे देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


Lockdown: खुशखबर! एका वर्षात नोकरी गेली तर कंपनी भरणार कारचा ईएमआय!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -