घरदेश-विदेशपी. चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या

पी. चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या

Subscribe

एअरसेल मॅक्सिस प्रकरणामध्ये पी. चिदंबरम यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम विरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती सीबीआयने कोर्टात दिली आहे.

एअरसेल मॅक्सिस प्रकरणामध्ये आता देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणामध्ये पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम विरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती सीबीआयने कोर्टात दिली आहे. दिल्लीतील पटीयाळा न्यायालयानं पी. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम या दोघांना दिलेला अंतरिम जामीन १८ डिसेंबर पर्यंत वाढवला आहे. पण, त्यावेळी दोघांविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिल्याची माहिती देखील सीबीआयनं दिली आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याविरोधात ईडीनं पुरवणी चार्जशीट दाखल केली होती. यामध्ये पी. चिदंबरम यांना क्रमांक एकचा आरोपी असं म्हटलं गेलं आहे. त्याशिवाय या चार्जशीटमध्ये चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त इतर आठ जणांची नावं देखील आहेत. पतियाळा हाऊस कोर्टात आज अर्थात सोमवारी एअरसेल मॅक्सिस प्रकरणामध्ये सुनावणी झाली. या प्रकरणामध्ये सीबीआयनं वेगळी चार्जशीट दाखल केली आहे.

दरम्यान पी. चिदंबरम यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. याकाळात पी. चिदंबरम यांनी पुत्र कार्ती चिदंबरम याला मदत केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात एअरसेल-मॅक्सिस प्रकरणामध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी करत सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. यामध्ये पैशांची देवाण – घेवाण झाली होती असा आरोप देखील यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. अखेर या प्रकरणात आता पी. चिदंबरम यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -