१०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत 6 GB हाय – स्पीड डेटा

वर्क फ्रॉम होम करत असाल आणि तुमचे इंटरनेट लवकर संपत असेल तर १०० रुपयांत या कंपनीचे रिचार्ज करा.

airtel 4g data voucher with 6gb high speed internet data at rs 98
१०० रुपयापेक्षाही कमी किमतीत 6 GB हाय - स्पीड डेटा

देशभरातील लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांमधील लाखो लोकं घरून काम करत आहेत. त्यामुळे या काळात इंटरनेटची गरजदेखील अधिक प्रमाणात वाढली आहे. सध्या इंटरनेटचा वापर पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. या आधी लोकं दररोज १.५ जीबी किंवा २ जीबी डेटा वापरत होते. परंतु, आता हा डेटा वापरण्यासाठी कमी पडत आहे. घरात बसून काम केल्यामुळे दररोज डेटाची मर्यादा पटकन संपुष्टात येत आहे. त्यामुळे अशा बऱ्याच कंपन्या आहेत, ज्या ४ जी डेटा व्हाउचर्स उपलब्ध करुन देत असून त्याचा हाय स्पीड डेटा ग्राहकांना देत आहेत. विशेष म्हणजे १०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत तुम्हाला हा हाय स्पीड डेटा मिळणार आहे.

कमी किंमतीत जास्त डेटा

१०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत 6 GB हाय – स्पीड डेटा एअरटेल कंपनीने उपलब्ध करून दिला आहे. फक्त ९८ रुपयांत तुम्हाला ४ जी डेटा व्हाऊचर उपलब्ध करून देण्यात येणार असून २८ दिवसांपर्यंत तुम्ही हा डेटा वापरू शकता. मात्र, यामध्ये व्हॉईस कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा दिली जाणार नाही.

४८ रुपयांत डेटा उपलब्ध

याशिवाय जर तुम्हाला कमी किंमतीच्या डेटा पॅकचे रिचार्ज करायचे असेल, तर तुम्हाला कंपनीने अजून एक पर्याय दिला आहे. यामध्ये फक्त तुम्हाला ४८ रुपयांचा प्लॅन देण्यात आला आहे. यामध्ये ३ जीबी 3G/ 4G हाय-स्पीड डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा डेटा २८ दिवसांपर्यंत तुम्ही वापरू शकता.


हेही वाचा – Corona: हैदराबादमधील कोरोना कार करतेय नागरिकांमध्ये जनजागृती