घरटेक-वेकएअरटेल आणि जिओ 'या' तारखेपासून देशात 5G सेवा देण्यासाठी सज्ज

एअरटेल आणि जिओ ‘या’ तारखेपासून देशात 5G सेवा देण्यासाठी सज्ज

Subscribe

सध्याचं जग हे अत्यंत टेक्नोसॅव्ही आणि वेगवान झालं आहे. त्यामुले या 5G सेवेचा देशवासियांना नक्कीच फायदा होणार आहे.

देशात 5G इंटरनेट सेवा केव्हा पासून सुरु होणार याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होता. 5G इंटरनेट सेवेची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सध्याचं जग हे अत्यंत टेक्नोसॅव्ही आणि वेगवान झालं आहे. त्यामुले या 5G सेवेचा देशवासियांना नक्कीच फायदा होणार आहे.

1) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात 29 सप्टेंबर रोजी देशात 5G सेवा सुरु होणार आहे असं म्हटलं होतं.

- Advertisement -

 

2) इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) 2022च्या उद्घाटनावेळी भारतात 5G सेवा अधिकृतपणे सुरू होईल अशी शक्यता आहे. त्याचबरोबर एअरटेल आणि जिओ या दोन कंपन्या देशात 5G सेवा सुरु करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत असं दोन्ही कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

 

3) त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात देशातील 13 मोठ्या शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

 

4) मुंबई आणि पुण्यासोबत भारतातील अहमदाबाद, बंगळुरु, चंदिगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैद्राबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ या शहरांमध्ये 5G सेवा दिली जाण्याची शक्यता आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -