घरअर्थजगतWorld Bank President : जागतिक बँकेची धुरा भारतीयाच्या हाती, अजय बंगा नवे...

World Bank President : जागतिक बँकेची धुरा भारतीयाच्या हाती, अजय बंगा नवे अध्यक्ष

Subscribe

भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील महिन्यात 02 जूनला ते आपल्या पदाचा पदभार स्विकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय वंशाचे अजय बंगा (Ajay banga) हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष (World bank president) म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील महिन्यात 02 जूनला ते आपल्या पदाचा पदभार स्विकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अजय बंगा यांची निवड जागतिक बँकेच्या 25 सदस्यीय कार्यकारी मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे बंगा या पदाचा कार्यभार सांभळणार आहेत. अजय बंगा हे जागतिक बँकेचे प्रमुख होणारे भारतीय-अमेरिकन आणि अमेरिकन शीख समुदायातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.

हेही वाचा – ‘जन्टलमन्स गेम’ की शेम शेम!

- Advertisement -

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर या बँकेची धुरा कायमच अमेरिकन व्यक्तीच्या हाती राहिली. पण पहिल्यांदाच या बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान होणार आहे. जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यानंतर बंगा सर्व सूत्रे आपल्या हाती घेतील. महत्त्वाची बाब म्हणजे अजय बंगा हे या पदावर काम करण्यासाठी योग्य व्यक्ती असल्याचे म्हणत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी सुद्धा बंगा यांचे कौतुक केले होते.

जागतिक बँकेचे निवेदन…
अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर बँकेकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनात लिहिण्यात आले आहे की, “संचालक मंडळ बंगा यांच्यासोबत जागतिक बँक गट विकास प्रक्रियेवर काम करण्यास उत्सुक आहे. एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत या विकास प्रक्रियेवर एकमत झाले. याशिवाय, विकसनशील देशांसमोरील कठीण विकास आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रयत्नांवर एकत्र काम करायचे आहे.”

- Advertisement -

अजय बंगा यांचा अल्पपरिचय..
अजय बंगा यांचा जन्म भारतात झाला आहे. पण काही वर्षांनी ते अमेरिकेत जाऊन स्ठायिक झाले आहेत. ते 2007 पासून अमेरिकेचे नागरिक आहेत. बंगा यांनी आयआयएम, अहमदाबाद येथून एमबीए पदवी मिळवण्यापूर्वी दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेज येथून अर्थशास्त्र विषयातील पदवी घेतली. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारतात नेस्ले समूहामधून केली. त्यानंतर सिटीग्रुपमध्ये काम केले. 2016 मध्ये भारत सरकारने त्यांना चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -