घरट्रेंडिंगमोदींच्या 'त्या' निर्णयाचे सेलेब्रेटींनी केले कौतूक...ट्वीट करत लोकांना केले आवाहन!

मोदींच्या ‘त्या’ निर्णयाचे सेलेब्रेटींनी केले कौतूक…ट्वीट करत लोकांना केले आवाहन!

Subscribe

करोनाच्या वाढत्या संकटाला सामोरे जाण्यास आपण किती तयार आहोत, याची चाचपणी करण्यासाठी येत्या रविवारी, २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळा. त्यादिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कोणीही घरातून बाहेर पडू नये. अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी घराबाहेर पडावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले. त्यांच्या आवहानानंतर सेलेब्रेटींनीही नरेंद्र मोदींना साथ देत ट्वीट करत नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.

अजय देवगणने ने ट्वीट करत म्हटले आहे की, नमस्कार! आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना विनंती केली आहे की करोनाशी दोन हात करण्यासाठी जनता कर्फ्यू पाळा. २२ मार्चला सगळ्यांनी घरात थांबा. काळजी घ्या.

- Advertisement -

शिल्पा शेट्टीने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आपण स्वत: काळजी घेणं आणि सुरक्षीतता पाळणं गरजेचं आहे. पॉझिटीव्ह आणि जवाबदार नागरिक बना. जय हिंद.’

- Advertisement -

रितेश देशमुख, ‘ माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत करण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे वर्क फॉर्म होम करावं असं सांगितलं आहे. ६० वर्षावरील व्यक्तींनी घरातून बाहेर पडू नये. मला खात्री आहे भारत करोनाशी दोन हात करेल

शबाना आझमी, नरेंद्र मोदी यांनी करोना विषयी खूप चांगले मार्गदर्शन केले आणि त्यांनी सगळ्यांना २२ मार्चला रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी ५ वाजता हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या, लोकांना मदत करणाऱ्या लोकांचे आभार मानणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -