घरदेश-विदेशदिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय माकन यांनी दिला राजीनामा

दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय माकन यांनी दिला राजीनामा

Subscribe

दिल्लीतील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांचा राजीनामा स्विकारला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दिल्लीतील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. मागील अनेक महिन्यांपासून माकन हे पक्ष सोडण्याची चर्चा होती. मात्र या फक्त अफवा असल्याचे माकन यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या जागी शीला दीक्षित येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज अखेर ट्विट करुन त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. माकन यांनी ट्विटमध्मे लिहिले आहे की,”२०१५ विधानसभेनंतर मागील चार वर्षे मला काँग्रेस कार्यकर्ता, प्रसार माध्यम आणि आमचे नेते राहुल गांधींकडून आदर आणि सहकार्य मिळाले. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.”

- Advertisement -

या पूर्वी उडाली होती अफवा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आणि दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय माकन यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याच्या बातमीने सप्टेंबर महिन्यात एकच खळबळ उडवून दिली होती. मात्र ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. सोशल मीडियावर अचानक ही बातमी व्हायरल होऊ लागली होती. गेल्या अनेक वर्षांपासून अजय माकन दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवत होते. आपल्या प्रकृती अस्वस्थतेमुळे राजीनामा देत असल्याचे कारण समोर येत होते. अजय माकन यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवला असून तो मंजूर झाला नसल्याचे सांगितले जात होते. हीच बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -