घरदेश-विदेशINS Dhruv: भारताच्या पहिल्या न्यूक्लिअर मिसाईल ट्रॅकिंग जहाजाचे आज लाँचिंग, शत्रूच्या हालचालींवर...

INS Dhruv: भारताच्या पहिल्या न्यूक्लिअर मिसाईल ट्रॅकिंग जहाजाचे आज लाँचिंग, शत्रूच्या हालचालींवर ठेवणार नजर

Subscribe

भारताच्या पहिल्या न्यूक्लिअर मिसाईल ट्रॅकिंग जहाज ध्रुवचे आज लाँचिंग होणार आहे. परमाणु आणि बॅलिस्टिक मिसाईलला ट्रॅक करणारे हे देशाचे पहिले जहाज असेल. या तंत्रज्ञानाचा वापर करणारा भारत हा सहावा देश ठरणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्या हस्ते आज भारताच्या पहिल्या बॅलिस्टिक मिसाईल ट्रॅकिंग जहाज ध्रुव चे लाँचिंग होणार आहे. त्याची सुरुवात विशाखापट्टणमपासून होईल. हे विशेष जहाज शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा (मिसाईल) मागोवा घेईल तसेच पृथ्वीच्या कक्षेतील उपग्रहांचे निरीक्षण करेल.

हिंदुस्तान शिपयार्डने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) यांच्या सहकार्याने या ध्रुव जहाजाची निर्मिती केली आहे. आयएनएस ध्रुव जहाजामध्ये शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेत समुद्राच्या तळाचा नकाशा बनवण्याची क्षमता आहे. या ध्रुव परमाणु मिसाईलमध्ये बॅलिस्टिक मिसाईल आणि जमिनीवर आधारित सॅटेलाईटचे ट्रॅकिंग करण्याची अधिक सोप्प्या पद्धत आहे. याच्या निर्मितीच्या कामाला २०१४ सालापासून सुरुवात झाली. २०१८ मध्ये याचे बनवण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर २०१९ मध्ये ध्रुवची चाचणी करण्यात आली. या चाचणीत ध्रुव जहाज शत्रूंसह लढा देण्यास यशस्वी ठरले

- Advertisement -

१५,००० टन मिसाईल रेंज इंस्ट्रुमेंटेशनचे जहाज

स्वदेशी बनावटीचे १५,००० टन मिसाईल रेंज इंस्ट्रुमेंटेशन असणारे हे जहाज लांब पल्ल्याच्या रडार, ट्रॅकिंग अँटीना आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीसह सुसज्ज आहे. १७५ मीटर लांबीच्या या मिसाईल ट्रॅकिंग जहाजाला यापूर्वी ‘व्हीसी 11184’ असे नाव देण्यात आले होते. या जहाजाची निर्मिती अशा वेळी झाली आहे जेव्हा चीनी जहाज सध्या हिंदी महासागरात दुसऱ्या जहाजांवर पाळत ठेवण्याच्या मोहिमेवर आहे.

भारत ठरला ६ वा देश

- Advertisement -

चीन नियमितपणे हिंद महासागरात अशी जहाजे आणि सर्वेक्षण जहाजे पाठवतोय. या जहाजांचा उपयोग नेव्हिगेशन आणि पाणबुडीच्या ऑपरेशनसाठी तसेच समुद्रातील शत्रू राष्ट्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवत इतर डेटा शोधण्यासाठी देखील केला जातो. हे स्पेशल आयएनएस ध्रुव जहाज भारतासह अमेरिका, रशिया, चीन आणि फ्रान्स सारख्या काही निवडक देशांकडेच आहे.

नौदलाची एनटीआरओ टीम करेल नेतृत्त्व

आयएनएस ध्रुवचे नेतृत्त्व नौदलाच्या राष्ट्रीय संशोधन तांत्रिक संस्था (एनटीआरओ) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) च्या सदस्यांद्वारे केले जाईल. आयएनएस ध्रुवमध्ये प्रगत तांत्रिक उपकरणांची विस्तृत श्रेणी आहे. त्यावर हेलिकॉप्टर डेट करण्यासाठीचे विशेष तंत्र आहे. शत्रूच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा शोध घेण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी तसेच समुद्रातील संकटांचा अर्ली अलर्ट देणारी यंत्रणा म्हणून काम करेल. हे जमिनीवरून उडणाऱ्या अनेक वॉरहेडसह पाणबुड्यांना लक्ष्य करू शकते.

INS ध्रुवची काही खास वैशिष्ट

१) १५,००० टन वजनाच्या INS ध्रुवची किंमत सुमारे 725 कोटी रुपये इतकी आहे.

२) आयएनएस ध्रुव इलेक्ट्रॉनिक स्कॅन एरे (एईएसए) रडारसह सुसज्ज आहे. त्यामुळे शत्रू देशाच्या मिसाईल रेंजचा अचूक डेटा शोधू शकतो.

३) बॅलिस्टिक मिसाईलचाही घेईल मागोवा

४)  क्षेपणास्त्र चाचण्यांवर देखरेख करण्यासाठी विविध स्पेक्ट्रम स्कॅन करण्याची क्षमता तसेच गुप्तचर उपग्रहांचे निरीक्षण करण्याची क्षमता.

५) यातील सर्विलांस सिस्टमच्या ऑपरेशनमध्ये १४ मेगावॅट विजेची आवश्यकता असेल जी आयएनएस ध्रुव स्वतः तयार करेल.

६) या प्रकारचे जहाज चालविणारा भारत आता जगातील सहावा देश असेल.


Ganeshostav 2021 :सलमान ,आयुष आणि वरुण धवन थिरकले ‘विघ्नहर्ता’च्या


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -