महायुतीला बहुमत मिळालं आहे, मात्र सरकार स्थापन करण्याचं गाड अडलंय, एकामुळे ते म्हणजे मुख्यमंत्रिपद. एकनाथ शिंदे यांनी दावा सोडल्यानं भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस की अन्य कुणाला संधी मिळणार, हे स्पष्ट होत नाही. पण, सातत्यानं उपमुख्यमंत्रिपद पदरात पडणाऱ्या अजितदादा पवार यांचं यंदाही मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगणार आहे. याबद्दलच प्रश्न विचारल्यावर अजितदादा भडकल्याचं पाहायला मिळाले.
महायुतीचे मुख्यमंत्रिपद, कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदे कुणाला किती मिळणार? याची चर्चा करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एक बैठक आहे. त्यासाठी अजितदादा पवार दिल्लीत पोहोचले आहेत. तेव्हा, राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजितदादांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा : “जाणता राजांनी महाराष्ट्राचं खूप वाटोळं केलंय, आता…”, भाजपच्या बड्या नेत्याची शरद पवारांवर विखारी टीका
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजून पाच वर्षे अजितदादा मुख्यमंत्री होण्याची वाट पाहावी लागणार का? असा प्रश्न एका पत्रकारानं विचारला. या प्रश्नावर अजितदादा चिडल्याचे पाहायला मिळाले.
अजितदादा म्हणाले, “मी काय ज्योतिषी नाही. त्यासंदर्भात आमची चर्चा होणार आहे. देशाचा आणि राज्याचा सर्वांगिण विकास व्हावा, हे आमचं ध्येय आहे. त्यादृष्टीनं आम्ही पुढे चाललो आहे.”
तुमच्या पक्षाला केंद्रात मंत्रिपद मिळणार का? हाही प्रश्न विचारल्यावर अजितदादांनी म्हटलं, “अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या बैठक होणार आहे. मात्र, बैठकीत काय बोलणार, हे तुम्हाला कशाला सांगू? काय बोलायचे हा आमचा अधिकार आहे, तेवढा तरी अधिकार आम्हाला ठेवा.”
हेही वाचा : कडूंनी म्हटलं, ‘माझा पराभव करण्याची त्यांची लायकी नाही’; नवनीत राणा डिवचत म्हणाल्या, “दादा आता कसं…”