घरदेश-विदेशAjmer Express ; बोगीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग; प्रवाशांनी खिडक्या, दारातून मारल्या उडल्या

Ajmer Express ; बोगीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग; प्रवाशांनी खिडक्या, दारातून मारल्या उडल्या

Subscribe

 

नवी दिल्लः Ajmer Express सियालदह-अजमेर एक्स्प्रेस १२९८७ च्या द्वितीय श्रेणीच्या बोगीमध्ये मंगळवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा आणि खिडकीमधून उड्या मारल्या. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. जवळपास ४० मिनिटे थांबवण्यात आली. या घटनेत प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

- Advertisement -

कौशंबी जिल्ह्यातील भारवारी रेल्वे स्थानकावर ही घटना दुपारी १.२२ मिनिटांच्या सुमारास घडली. बोगीमधून धूर येत असल्याची तक्रार प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. अचानक आलेल्या धुरामुळे प्रवाशांमध्ये घबराहट पसरली होती. प्रवाशांनी दरवाजा व खिडक्यांमधून उड्या घेतल्या. रेल्वे कर्मचारी बोगीजवळ आले आणि त्यांनी आग विझविण्याचे काम सुरु केले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे रेल्वेने सांगितले. आगीमुळे अजमेर एक्स्प्रेसच्या पुढच्या प्रवासाला उशीर झाला.

- Advertisement -

एक्स्प्रेसच्या मागील बाजू असलेल्या द्वितीय श्रेणीच्या बोगीतून अचानक धूर येऊ लागला. त्यावेळी एक्स्प्रेस भारवारी स्थानकावर ट्रक बदलत होती. धुरामुळे प्रवाशी घाबरले. स्टेशन परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.  प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी चेन ओढून ट्रेन थांबवली. घाबरुन प्रवाशांनी दरवाजा व खिडकीमधून उड्या घेतल्या. रेल्वे कर्मचारी तत्काळ बोगी जवळ गेले. कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचे काम सुरु केले, अशी माहिती भारवारी रेल्वे स्थानकाचे अधिक्षक डी एन यादव यांनी सांगितले.

सिकंदराबाद-अगरतला एक्स्प्रेसच्या बोगीतून धूर

सिंकदराबाद-अगरतला एक्स्प्रेसच्या बोगीतून मंगळवारी अचानक धूर आला. प्रवाशांनी याची तक्रार केली. ओडिशा ब्रम्हपूर रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस थांबवण्यात आली. बोगीतील एसीमधून हा धूर येत होता. रेल्वे कर्मचारी तत्काळ बोगीजवळ गेले. किरकोळ तांत्रिक बिघाडामुळे एसीतून धूर येत असल्याचे नंतर स्पष्ट झाले. धूर नियंत्रणात आणण्यात आला. मात्र घाबरलेल्या प्रवाशांनी पुढील प्रवास करण्यास नकार दिला.

केरळमद्ये बोगीला आग लावणाऱ्या अटक

केरळमध्ये inter-city express मधील बोगीला सोमवारी आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन महिन्यात केरळमध्ये घडलेली ही दुसरी घटना आहे. एप्रिल महिन्यात Alappuzha-Kannur Executive Express मध्ये लागलेल्या आगीत लहान मुलाचा होरपळून मृत्यू झाला होता. तर नऊ जण जखमी झाले होते. पश्चिम बंगालमध्येही एका एक्स्प्रेसच्या कोचला आग लागली होती. प्रवाशांना तत्काळ तेथून बाहेर काढण्यात आले होते. १ जून २०२३ रोजी ही घटना घडली होती. ही आग लावणाऱ्याला दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी अटक केली. अटक आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -