घरताज्या घडामोडीशाहीन बाग आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्याचा सत्कार!

शाहीन बाग आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्याचा सत्कार!

Subscribe

शाहीन बागेत आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या तरुणाचा अखिल भारत हिंदू महासभेकडून सत्कार करण्यात येणार आहे.

एकीकडे शाहीनबागमधील मुस्लीम महिला आणि आंदोलकांवर राम भगत नावाच्या एका तरुणाने गोळीबार केल्यामुळे देशभर संताप व्यक्त होत असताना आता याच तरुणाचा सत्कार होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. हिंदू महासभेकडून त्या तरुणाचा सत्कार केला जाणार आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदू महासभेने गोळीबार करणाऱ्या तरुणाला राष्ट्रभक्त म्हटलं आहे. ‘आम्ही नथुराम गोडसेचा आदर करतो. आणि जर कुणी हत्यार उचलून देशविरोधी आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असेल, दहशतवादाला संपवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती व्यक्ती हिंदू महासबेसाठी आदरणीयच आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचं शिष्टमंडळ त्याला भेटायला जाणार आहे आणि त्याचा सत्कार करणार आहे’, असं महासभेच्या एका नेत्याने सांगितलं आहे.

काय घडलं शाहीन बागेत?

गुरुवारी दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळील शाहीन बाग परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर एका इसमाने गोळीबार केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले असून त्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा तरुण आंदोलकांमधून पुढे झाला आणि त्याने बंदूक काढून गोळीबार केला. ‘शाहीन बाग, खेल खत्म’, अशी पोस्ट त्याने गोळीबार करण्याआधी फेसबुकवर टाकली होती.

- Advertisement -

दरम्यान, गोळीबाराआधीच भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील जाहीर प्रचारसभेमध्ये दिलेल्या वादग्रस्त घोषणांवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ठाकूर यांच्या वक्तव्यामुळेच आंदोलकांवर गोळीबार करण्याच्या कृतीला प्रेरणा मिळाल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -