घरताज्या घडामोडीUP Assembly Election 2022 : ३०० युनिट वीज मोफत देणार, यूपी निवडणुकीपूर्वी...

UP Assembly Election 2022 : ३०० युनिट वीज मोफत देणार, यूपी निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांची मोठी घोषणा

Subscribe

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election 2022) मोठी घोषणा केली आहे. ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार (Free Electricity) असल्याचं आश्वासन अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी दिलं आहे. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाणार आहे. यापूर्वी समाजवादी पक्षाकडून ट्विट (Tweet) करत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती. त्यानंतर आता मोफत वीज देणार असल्याचं आश्वासन अखिलेश यादव यांनी केलं आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अखिलेश यादव यांनी गुरुवारी लखनऊमध्ये त्यांचे काका शिवपाल यादव यांची भेट घेतली. या भेटीनंतर समाजवादी पक्ष आणि शिवपाल यादव यांची प्रगतिशील समाजवादी पार्टी लोहिया पक्ष मिळून निवडणूक लढतील, असं यादवांनी जाहीर केलं. मात्र, शिवपाल यादवांच्या पक्षाला किती जागा देणार, याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाहीये.

३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचं आश्वासन

वीज मोफत देण्याबाबत समाजवाद पार्टीच्या अगोदर आम आदमी पार्टीने देखील ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आणि सपाचे आमदार पुष्पराज जैन उर्फ​ पम्पी जैन यांच्या घरावर आणि ठिकाणांवर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आले आहेत. सपाच्या नेत्याच्या घरात आयकर विभागाने धाड टाकली असून त्याचा परिणाम निवडणुकींवरती होऊ शकतो. सत्ताधारी पक्षापासून ते थेट विरोधी पक्ष निवडणूक प्रचारात गुंतले आहेत.

- Advertisement -

अखिलेश यादव यांचा भाजपवर हल्लाबोल

दरम्यान, छापेमारींबाबत अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी सांगितलं की, आम्हाला पहिलेच माहिती होतं की समाजवाद्यांवर छापे नक्की पडणार. द्वेषाचा सुगंध पसरवणाऱ्यांना चांगला सुगंध कसा आवडेल?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पीयूष जैन यांच्या घरावर छापा पडला आहे. परंतु त्यांचा समाजवादी पार्टीशी काहीही संबंध नाहीये, असं यादव म्हणाले.


हेही वाचा : नात्याला काळिमा! ५० रुपये चोरले म्हणून पित्याकडून मुलाची निर्घृण हत्या


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -