घरताज्या घडामोडीUP Assembly Election 2022 : ३०० यूनिट मोफत वीज मिळणार, उद्यापासून समाजवादी...

UP Assembly Election 2022 : ३०० यूनिट मोफत वीज मिळणार, उद्यापासून समाजवादी पार्टीच्या प्रचाराला सुरूवात

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी समाजवादी पार्टीने नवा फंडा वापरला आहे. समाजवादी पार्टीने ३०० यूनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. तसेच उद्यापासून समाजवादी पार्टीच्या या प्रचाराला सुरुवात देखील होणार आहे. समाजवादी पार्टीच्या एका फॉर्ममध्ये आपलं नाव नोंदवा आणि ३०० यूनिट वीज मोफत मिळवा, असं आवाहन समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केलं आहे.

सपाचे नेते अखिलेश यादव यांनी लखनऊमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी यादव म्हणाले की, ज्यांना ३०० यूनिट वीज मोफत हवी आहे. त्यांनी फॉर्ममध्ये आपलं नाव लिहून पक्षाकडे जमा करावा, तुम्हाला वीज देऊ. मोफत वीज देण्याचा हा मुद्दा निवडणूक घोषणापत्रातही समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या प्रचाराला किंवा अभियानाला उद्यापासून सुरूवात होणार आहे, असं अखिलेश यादव म्हणाले.

- Advertisement -

ज्या लोकांनी वीज वापरली नाही किंवा ज्यांच्याकडे मीटरच नाहीये, अशा लोकांनाही वीजबिल पाठवण्यात आलंय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाहीये. जनावरे दगावली त्याचीही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाहीये. असं यादव म्हणाले.

४०० जागांवर बढाई मारणार

विधानसभा निवडणुकीत सपाला ४०० जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. आमच्याकडे ओमप्रकाश राजभर आणि स्वामी प्रसाद मौर्य आले आहे. सपा आणि आरएलडी युती पक्ष असून एकत्रित निवडणूक लढणार आहे. त्यामुळे आम्ही ४०० जांगावर विजय मिळवणार असल्याचा दावा, यादवांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदींना पकडल्याचा नाना पटोलेंचा दावा, पोलिसांनी दावा फेटाळला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -