घरताज्या घडामोडीUP Election 2022: मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून अखिलेश यादव लढणार निवडणूक, समाजवादी पार्टीची...

UP Election 2022: मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून अखिलेश यादव लढणार निवडणूक, समाजवादी पार्टीची मोठी घोषणा

Subscribe

उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढण्यासाठी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पहिलीच तयारी केली होती. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. अशातच समजावादी पार्टीने मोठी घोषणा केली आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही विधानसभा निवडणुकीत उडी घेतली असून मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत.

सपा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी देखील याच मतदार संघातून निवडणूक लढवली होती. तसेच त्यांचा विजय देखील झाला होता. या व्यतिरिक्त सपाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे करहलच्या जैन इंटर कॉलेजमधून शिक्षण झाले आहे. तसेच ते येथे शिक्षकही होते. मुलायम सिंह यादव यांच्या सैफई या गावापासून करहाल हे फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे.

- Advertisement -

करहल विधानसभा मतदार संघ समाजवादी पार्टीने सात वेळा जिंकला आहे. १९८५ मध्ये विधानसभा मतदार संघातून दलित मजदूर किसान पार्टीचे बाबूराम यादव, १९८९ आणि १९९१ मध्ये समाजवादी जनता पार्टी आणि १९९३, १९९६ मध्ये सपाच्या तिकिटावर बाबूराम यादव आमदार झाले होते. २००० साली अनिल यादव, २००२ मध्ये भाजपा, २००७, २०१२ आणि २०१७ मध्ये सपाच्या तिकिटावर सोवरन सिंह यादव आमदार म्हणून निवडून आले होते.

- Advertisement -

हेही वाचा : Goa Assembly Elections 2022: आपच्या तिकिटावर निवडणूक लढा, केजरीवालांची उत्पल पर्रिकरांना खुली ऑफर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -