घर देश-विदेश अकलेचे दिवाळे, मोबाइल चोरीला जाऊ नये म्हणून...; पाकिस्तानच्या मंत्र्याने दिला अजब सल्ला

अकलेचे दिवाळे, मोबाइल चोरीला जाऊ नये म्हणून…; पाकिस्तानच्या मंत्र्याने दिला अजब सल्ला

Subscribe

पाकिस्तानमध्ये सध्या गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोकेवर काढले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये भुरट्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, यामध्ये मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : आर्थिक गरिबीशी झुंजत असलेल्या पाकिस्तानमध्ये कायदा आणि सुव्यवस्थाही कोलमडली आहे. पाकिस्तानात दरोडेखोर दररोज बंदुकीच्या धाकावर उघडपणे लोकांना लुटत आहेत. देशातील गुन्हेगारी दरावर चिंता व्यक्त करताना, पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे काळजीवाहू मंत्री निवृत्त ब्रिगेडियर हरिस नवाज यांनी मोबाइल चोरीला जाऊ नये म्हणून लोकांना एक अजब सल्ला दिला आहे. या सल्ल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.(Akle’s bust, to prevent the mobile from being stolen…; The Minister of Pakistan gave a strange advice)

पाकिस्तानमध्ये सध्या गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोकेवर काढले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये भुरट्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, यामध्ये मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या मोबाइल चोरीच्या घटना रोखण्यासाठी पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे काळजीवाहू मंत्री निवृत्त ब्रिगेडियर हरिस नवाज यांनी नागरिकांना मोबाइल चोरीला जाऊ नये म्हणून तो अशा गुप्त ठिकाणी ठेवा की, त्याला कुणीही चोरू शकणार नाही असा सल्ला दिला आहे. अशा या गजब सल्ल्यानंतर पाकिस्तानमधील सोशल मीडिया ट्रोलर्सनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

पोलिसांना सहकार्य करण्याचे केले आवाहन

- Advertisement -

वाढत्या मोबाइल चोरीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे, सोबतच गुन्हे कमी होण्यासाठी नागरिकांनीही शासन व पोलिसांना सहकार्य करावे. मोबाइल चोरीला जाऊ नये म्हणून फोन गुप्त ठिकाणी ठेवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा : मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्या पाटणा उच्च न्यायालयाला सुप्रीम कोर्टाने सुनावले; म्हणाले- पुन्हा एकदा…

कराची बनतेय गुन्हेगारीचे हॉटस्पॉट

- Advertisement -

दहशतवादी कारवायांसाठी आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी ओळखून असलेल्या पाकिस्तानची मागील काही महिन्यांपासून आर्थिक कोंडी झालेली आहे. अशातच आता पाकिस्तानमध्ये गुन्हेगारीने डोकेवर काढले असून, कराची शहर गुन्हेगारीचे हॉटस्पॉट बनत आहे.

व्यापारी समुदायाला ठरवले जबाबदार

पाकिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्याने अशी टिप्पणी करण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी, कराचीचे तत्कालीन पोलीस प्रमुख जावेद आलम ओधो यांनी शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे. प्रसारमाध्यमांद्वारे असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्यांमध्ये शहरातील व्यापारी समुदाय जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Chandrayaan-3 : विक्रम लँडर चंद्रावर उतरलेल्या ठिकाणाचा NASAने घेतला फोटो, पाहिलात का?

पहिल्याच तीन महिन्यांत 21 हजार गुन्ह्यांची नोंद

एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, 2023 च्या पहिल्या तीन महिन्यांत कराची शहरामध्ये सर्वसामान्य म्हणजेच रस्त्यावरील लुटमारीच्या 21 हजार घटना घडल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

- Advertisment -