घरदेश-विदेशया गायकाने काढली स्वत:च्या नावाची क्रिप्टोकरन्सी!

या गायकाने काढली स्वत:च्या नावाची क्रिप्टोकरन्सी!

Subscribe

क्रिप्टोकरन्सीला देशात मान्यता नाही. पण, जगातल्या काही देशांनी या करन्सीला मान्यता दिली आहे. आफ्रिकेतील एकॉन या गायकाने स्वत:च्या नावाने करन्सी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तो २००० एकरावर नवीन शहराची उभारणी करणार आहे.

क्रिप्टोकरन्सीच्या ( आभासी चलन ) नावाने फसवणूक झाल्याचे प्रकार आपल्या देशात तरी काही नवीन नाहीत. क्रिप्टोकरन्सी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ते बिटकॉईन्स! आपल्या देशात बिटकॉईन्स किंवा क्रिप्टोकरन्सीला मान्यता नसली तरी जगताल्या बऱ्याच देशांनी क्रिप्टोकरन्सी स्वीकारली आहे. आता तुम्हाला जर तुम्ही कुणी सांगितले की आमुक एक गायक किंवा सेलिब्रेटी स्वत:च्या नावाने क्रिप्टोकरन्सी आणत आहे. तर, तुम्हीची पहिली प्रतिक्रिया काय असेल? आणखी एक गोष्ट म्हणजे हा गायक आपल्या देशातला नसून आफ्रिकेतील आहे. त्याचे नाव आहे एकॉन!

कशी असेल क्रिप्टोकरन्सी!

आफ्रिकेमध्ये गायक असणारा एकॉन स्वत;ची क्रिप्टोकरन्सी आणणार आहे. या क्रिप्टोकरन्सीचे नाव असणार आहे एकॉईन!कान लायन्स या ठिकाणी एकॉननी यासंदर्भातील घोषणा केली आहे. पेज सिक्स या वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. यासाठी एकॉन डाकार या शहरापासून जवळच असणाऱ्या त्याच्या जन्मगावी २००० एकरावर एका शहराची उभारणी करणार आहे. त्यानंतर या शहरामध्ये हि क्रिप्टोकरन्सी चालणार आहे. एकॉनची त्याची त्याची तयारी देखील केली असून लवकरच क्रिप्टोकरन्सीसह शहराच्या उभारणीला सुरूवात होणार आहे.

- Advertisement -

याबद्दल बोलताना एकॉनने सांगितले की, या करन्सीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्यामुळे लोकांच्या राहणीमानात सुधारणा होऊन त्यांच्या हातात पैसा खेळता राहिल. लोकांची वेगळी ओळख निर्माण होईल. शिवाय चलन व्यवस्थेमध्ये एक विश्वास देखील निर्माण होईल. असा विश्वास एकॉन याने व्यक्त केला आहे. क्रिप्टोकरन्सी किती विश्वासार्ह असेल असे विचारले असता एकॉनने सांगितले की, मी करन्सी तर घेऊन येत आहे आता लोकांना तिच्या विश्वासार्हतेबद्दल निर्णय घेऊ दे. एकॉनने क्रिप्टोकरन्सी आणण्याचा निर्णय घेतला असला तरी ती लोकांच्या फायद्याची ठरेल की नाही हे येणारी वेळच सांगेल.

‘आभासी’ चलनाचा ‘आभास’

बीट कॉईनसारखी क्रिप्टोकरन्सी जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक देशांनी बिटकॉईन्सला मान्यता दिली असली तरी, भारतात मात्र त्यावर बंदी आहे. आकर्षक परतावा मिळेल या लालसेने लोकांनी यामध्ये पैसे गुंतवले. पण सरकारने मात्र समांतर चलन उभारण्यास नकार देत त्यावर बंदी घातली. शिवाय बिटकॉईनच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह आहेच. ठाण्यात देखील क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली लोकांना तब्बल ५०० कोटींचा चुना लावला गेला. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी किती विश्वासार्ह हा प्रश्न आता विचारला जात आहे. मात्र, जगाभरातील अनेक देशांमध्ये सध्या क्रिप्टो करन्सीची चलनात आहे हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -