घरअर्थजगतAkshay Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताना घ्या 'या' गोष्टींची काळजी

Akshay Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

Subscribe

यंदा २२ एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाला फार मोठे महत्व आहे. हा सण वैशाख महिन्यातील शुल्क पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान परशूराम यांचा जन्म आणि देवी गंगेचा या धरतीवर अवतरण झाले होते. यामुळेच या दिवसाला फार शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे जरी एखादे नवे कार्य करायचे असेल तर तुम्ही या दिवशी नक्की करु शकता. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणे फार शुभ मानले जाते. लोक सुद्धा सोन्याची या दिवशी आवर्जून खरेदी करतात. पण सोनं खरेदी करताना काही गोष्टींची जरुर काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

कोठून सोनं खरेदी करतायत?
सोनं खरेदी करताना खासकरुन या गोष्टीकडे लक्ष द्या की, तुम्ही ते कोठून खरेदी करत आहात. सध्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सोन्याची विक्री केली जात आहे. त्यामुळेच सोनं खरेदी अशाच दुकानातून करा जे विश्वासहार्य आहेत. जेणेकरुन तुमची फसवणूक होणार नाही.

- Advertisement -

-कॅरेट
सोनं खरेदी करताना ते किती कॅरेटचे आहे याबद्दल जरुर विचारा. काही वेळेस सोनं हे बनावट असू शकते. त्यामध्ये जिंक आणि सिल्वर सारखे धातू मिसळून तुम्हाला देऊ शकतात.

- Advertisement -

-हॉलमार्क
सोनं खरेदी करताना हॉलमार्क तपासून पहा. कारण तो तुम्हाला सोन्याच्या शुद्धतेबद्दल सांगतो. १ एप्रिल २०२३ नंतर हॉलमार्क नसलेले दागिने खरेदी केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.

-मेकिंग चार्जेस
तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांबद्दलच्या मेकिंग चार्जेस बद्दल माहिती असले पाहिजे. अशातच ज्यांचे मेकिंग चार्जेस कमी आहे ते तुम्ही खरेदी करु शकता. जेणेकरुन पुढे जाऊन तुम्हाला त्याची विक्री करायची असेल तर तुमचे नुकसान होणार नाही.

 


हेही वाचा: Akshaya Tritiya 2023 : यंदा अक्षय्य तृतीयाला बनणार 6 शुभ योग; जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -