Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया...या दिवशी खरेदी करा सोन्याचं नाणे

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया…या दिवशी खरेदी करा सोन्याचं नाणे

Subscribe

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र तुम्हाला सोन्याचे नाणं खरेदी हे गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून पाहत आहात का? जर तुमचे उत्तर हो, असेल तर सोनं खरेदी करतेवेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत या बद्दल तज्ञ काय सांगतात हे पाहूयात.

-हॉलमार्क तपासून पहा
जेव्हा तुम्ही कोणत्याही सोन्याच्या दुकानात सोनं खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा हॉलमार्क तपासून पहा. कारण यामुळे सोन्याच्या शुद्धतेबद्दल माहिती मिळते. त्याचसोबत दागिन्यांवरील कोड, टेस्टिंग फोकस इप्रिंट आणि दागिन्यावरील स्टॅमिंग कधी केले आहे याकडे सुद्धा लक्ष द्या.

- Advertisement -

-सोन्याचे दर क्रॉस चेक करा
सोन्याच्या दरात चढ उतार होत असतो. अशातच तुम्ही दुकानात जाऊन सोनं खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरात सोन्याचे दर किती आहेत हे तपासून पहा. लक्षात ठेवा की, सोनं म्हणजेच २४ कॅरेट, २२ कॅरेट किंवा १८ कॅरेट अशा कोणत्या पद्धतीचे आहे हे सुद्धा पहा. २४ कॅरेटचे सोनं हे सर्वात शुद्ध आणि महाग असते. सर्वसामान्यपणे सोन्याचे दागिने हे २२ कॅरेटचेच बनवले जातात.

-मेकिंग चार्ज
सोनं खरेदी करताना दुकानदाराला मेकिंग चार्ज ही विचारा. कारण हे दर प्रत्येक दुकानांचे वेगवेगळे असतात. अशातच त्यावेळी पहा की, तुम्ही ज्या दुकानात सोनं खरेदी करण्यासाठी गेला आहात तेथे मेकिंग चार्ज हे अन्य दुकानांच्या तुलनेत अधिक तर नाही ना? हे सुद्धा लक्षात ठेवा की, मोठ्या आणि आलिशान ज्वेलरी स्टोरमध्ये मेकिंग चार्ज हा नेहमीच अधिक असतो.

- Advertisement -

-रोख रक्कमेने पेमेंट करणे टाळा
दागिने खरेदी करताना बहुतांश लोक याचे पेमेंट रोख रक्कमेने करतात. परंतु तसे करु नका. तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दागिन्यांसाठीचे पेमेंट करु शकता. दागिने खरेदी केल्यानंतर त्याचे पक्के बिल ही घेण्यास विसरु नका. जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर ते घरी आल्यानंतर त्याचे पॅकिंग निघालेले नसावे.

-मान्यताप्राप्त सोनं धारकांकडूनच खरेदी करा
दागिने नेहमीच उत्तम आणि मान्यता धारकांकडून खरेदी करावे. जेणेकरुन तुमची फसवणूक होण्यापासून तुम्ही दूर रहाल.

 

 


हेही वाचा: Akshaya Tritiya 2023 : यंदा अक्षय्य तृतीयाला बनणार 6 शुभ योग; जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

- Advertisment -