घरCORONA UPDATEऑनलाईन करा केवळ चार हजारात सोने खरेदी, अक्षय तृतीयासाठी खास ऑफर!

ऑनलाईन करा केवळ चार हजारात सोने खरेदी, अक्षय तृतीयासाठी खास ऑफर!

Subscribe

तनिष्क आणि कल्याण ज्वेलर्सने ऑनलाईनसाठी सोने खरेदीसाठी सज्ज झाले आहेत.

२६ एप्रिलला साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस. या शुभ दिवशी विवाह आणि सोने खरेदी केली जाते. त्यामुळे दरवर्षी या दिवशी सोने खरेदीसाठी दुकानात गर्दी असते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे या वर्षी पहिल्यांदा सोनं खरेदी होणार नाहीये किंवा लग्न होणार नाहीये.

या वर्षी अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होईल असा अंदाज होता. पण आता लॉकडाऊनमध्ये आता सोने खरेदी करायची असेल तर लॉकडाऊनमुळे नाराज होऊ नका. कारण यावर्षी तुम्हाला ऑनलाईन सोनं खरेदी करता येणार आहे. लॉकडाऊन संपल्यावर लगेचच तुमची डिलीव्हरी तुम्हाला मिळेल. ऑनलाईन शॉपिंगसाठी सोने ज्वेलर तयार झाले आहेत. यात तनिष्क आणि कल्याण ज्वेलर्सने ऑनलाईनसाठी सोने खरेदीसाठी तयार झाले आहेत.

View this post on Instagram

lockdown सुरु आहे पण अक्षय्य तृतीयाही जवळ आली आहे. अशा वेळेस तुमच्या आमच्यासारखीच मुक्तालाही पीएनजी ज्वेलर्समधे जाऊन वेढणी घेण्याची आठवण येतेय. या शुभ मुहूर्तावर सोनं तर घ्यायला हवंच ना? काय करणार आहे मुक्ता? हा व्हिडियो नक्की बघा… @swwapnil_joshi @muktabarve @pngjewellers @saurabhgadgil_png #AkshayTritiya #ShopOnline #SwapnilJoshi #MuktaBarve #PNGJewellers #ThinkPure #Jewellery #JewelleryBrand #StayHome #StaySafe #JewelleryLove #JewelleryDesigns

A post shared by ??????? ????? (@swwapnil_joshi) on

- Advertisement -

तनिष्कमधून करा ऑनलाईन ज्वेलरी

टाटा ग्रुपचा ब्रँण्ड तनिष्कमदून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. यासाठी कंपनीने काही खास ऑफरही तयार केल्या आहेत. अक्षय तृतीयाच्या या विशेष ऑफर १८ ते २७ एप्रिलपर्यंत उपलब्ध आहेत. ऑफरमध्ये घडणावळीवरील २५ ट्कके सुट देण्यात आली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

- Advertisement -

४ मे पासून पुन्हा सर्व सुरळीत होईल आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू पोहचवता येतील. अशी आशा तनिष्क कंपनीला आहे.

कल्याण ज्वेलर्समधूनही करू शकता खरेदी

कल्याण ज्वेलर्सनेही अक्षय तृतीयासाठी खास ऑनलाईन खरेदी सुरू केली आहे. जे ग्राहक अक्षय तृतीयेच्या दिवशी ऑनलाईन सोनं खरेदी करतील. त्या ग्राहकांना गोल्ड सर्टिफिकेट पाठवण्यात येईल. आणि लॉकडाऊन संपताच क्षणी ग्राहकांपर्यंत ते पोहचवण्यात येईल. कल्याण ज्वेलर्सने २१ एप्रिलपासूनच अक्षय तृतीयेसाठी विक्री सुरू केली आहे.

त्याचबरोबर अक्षय तृतीयाच्या आधी सॉवरेन गोल्ड ब्रॅण्डमध्येपण ऑनलाईन खरेदी करू शकता. या आर्थिक वर्षात सॉवरेन गोल्ड ब्रॅण्ड त्यांची पहिली सीरीज ग्राहकांसाठी खुली केली आहे, ग्राहक कमीतकमी १ ग्रॅम सोनं खरेदी करू शकतं. ज्याची किंमत ४,६३९ रूपये असेल. २४ एप्रिलपर्यंत आपली ऑर्डर ग्राहक नोंदवू शकतात. त्यात ५० रूपयांची सूट ग्राहकांन मिळेल. त्याची किंमत ४,५३९ रूपये असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -