घरदेश-विदेशअल जवाहिरीचा खात्मा होताच, अल-कायदाच्या नव्या म्होरक्याची निवड!

अल जवाहिरीचा खात्मा होताच, अल-कायदाच्या नव्या म्होरक्याची निवड!

Subscribe

काबूल : अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा अमेरिकेने खात्मा केला. त्यानंतर कुख्यात दहशतवादी अल-आदेल याची अल-कायदाचा नवा म्होरक्या म्हणून निवड करण्यात येईल, अशी शक्यता आहे. ओसामा बिन लादेनला अमेरिकेने कंठस्नान घातल्यानंतर अल जवाहिरीने या संघटनेची सूत्रे हाती घेतली होती.

अमेरिकेने काबूलमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी ठार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता होता. आता या संघटनेची सूत्रे अल आदेलच्या हाती जाण्याची शक्यता असून त्याचे नाव सैफ अल-आदेल आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नोटाबंदी फसली? बोगस नोटांचा बाजारात पुन्हा सुळसुळाट

सैफ अल आदेल हा इजिप्तचा रहिवासी असून १९९८मध्ये नैरोबी येथील अमेरिकन दूतावास आणि दार-ए-सलाम येथे झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये आदेलचा प्रमुख सहभाग होता. या हल्ल्यांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले होते. अमेरिकेकडून अल आदेलवर एक कोटी डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले होते. अल कायदाच्या मजलिस-ए-शूरा आणि लष्करी समितीचाही तो सदस्य आहे.

- Advertisement -

पाकिस्तानच्या आबोटाबाद येथे २ मे २०११ रोजी दहशतवादी ओसामा ओसामा बिन लादेनचा अमेरिकन नौदलाच्या सील कमांडोंनी खात्मा केला होता. त्यानंतर अल आदेलची हंगामी नेता म्हणून निवड झाली होती. त्यानंतर अल कायदाचा प्रमुख म्हणून अल-जवाहिरीची निवड झाली होती.

हेही वाचा – भारतात मंदीची अजिबात शक्यता नाही, निर्मला सीतारामन यांचे लोकसभेत उत्तर

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -