Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश अफगाणिस्तानात २० वर्षांनंतर पुन्हा येऊ शकतो अल-कायदा; तालिबानला इशारा

अफगाणिस्तानात २० वर्षांनंतर पुन्हा येऊ शकतो अल-कायदा; तालिबानला इशारा

Related Story

- Advertisement -

तालिबान्यांनी अफगाणिस्तान हस्तगत केल्यानंतर अफगाणिस्तानची सध्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यापासून तेथील वास्तव संपूर्णपणे बदल्याचे दिसत आहे. अमेरिकेत 9/11 च्या २० व्या वर्धापनदिनापूर्वी अमेरिकेकडून मोठी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातील बदलत्या परिस्थितीमध्ये अल-कायदा ही दहशतवादी संघटना तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा तेथे येऊ शकते, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी गुरुवारी हे सांगितले. तसेच अल-कायदा, ज्याने २० वर्षांपूर्वी अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा तालिबानच्या अधिपत्याखाली आल्यानंतर अल कायदा तेथे परत येऊ शकते, असे म्हणून अमेरिकेने तालिबानला इशारा दिला आहे.

आखाती राज्यांच्या चार दिवसांच्या दौऱ्याच्या समारोपप्रसंगी त्यांनी कुवेत शहरात पत्रकारांना असे सांगितले की, अमेरिकेला धोकादायक ठरणाऱ्या अफगाणिस्तानात अल कायद्याला तोडीस तोड प्रतित्युत्तर देण्यासाठी अमेरिका तयार आहे. भविष्यात अल-कायदा अफगाणिस्तानचा व्यासपीठ म्हणून वापर करण्याच्या शक्यतेचा उल्लेख करताना अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन पुढे म्हणाले की, तालिबानला सांगायचे आहे की, आम्हाला आशा आहे की ते असे होऊ देणार नाहीत. तसेच ऑस्टिन यांनी इशारा देत पुढे सांगितले की, आखाती राज्यांसह इतरत्र पाळत ठेवणे आणि हल्ला करणारे विमान वापरून अमेरिकन सैन्य अल-कायदा किंवा अफगाणिस्तानातून अमेरिकेस येणारा कोणताही धोका रोखू शकतो.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानात त्यांच्या राजवटीत अल-कायदा उदयास आला होता. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तालिबानने अमेरिकेला तालिबानवर हल्ला केला आणि अल कायदाला दहशतवाद्यांना अमेरिकेच्या ताब्यात देण्यास नकार दिला. यानंतर अमेरिकेने तालिबानवर हल्ला केला. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीला २० वर्षे पूर्ण झाली. परंतु अशापरिस्थितीत देखील अफगाणिस्तानातील अल-कायदाच्या कारवायांवर लक्ष ठेवत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.


राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, ४ ऑक्टोबरला मतदान

- Advertisement -