घरCORONA UPDATEसावधान! कोरोना व्हायरस तुमच्या घरातही असू शकतो

सावधान! कोरोना व्हायरस तुमच्या घरातही असू शकतो

Subscribe

कोरोनो या महामारीचा फैलाव होऊ नये म्हणून नागरिकांना क्वारनटाईन राहण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोनाचा धोका घराबाहेर आहे असे जरी सांगितले जात असले तरी कोरोना व्हायरस तुमच्या घरातही दबा धरुन बसलेला असू शकतो असा खळबळजनक दावा लॉन्ड्रीहीपच्या संचालिका देयान दिमित्रोव यांनी केला आहे. तुमचे किचन, बाथरुम, बेडरुम, चादरी, पडदे यापासून तुमचा टेबलक्लॉथही कोरोनाचा वाहक असू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.

दिमित्रोव यांच्या दाव्यानुसार आपलं घर हे देखील व्हायरसचा छुपे केंद्र असू शकते. मानवी केसांपेक्षा ९०० टक्के सूक्ष्म असलेला हा कोरोना व्हायरस कुठेही लपून बसू शकतो.

- Advertisement -

यात प्रामुख्याने रोजच्या वापरातील टॉवेल हा कोरोनाचा मुख्य वाहक असू शकतो. बाहेरुन आल्यावर आपण ज्या टॉवेलने हातपाय पुसतो. त्यावर सगळ्यात जास्त बॅक्टिरिया आणि व्हायरस असतात. यामुळे टॉवेल गरम पाण्यात धुऊनच वापरावेत.

किचनमध्ये काम करताना अनेकजण हातात ग्लोव्हज वापरतात. पण त्याच्याही माध्यमातून व्हायरस घरातील अनेक वस्तूंपर्यंत पोहचतो. यामुळे गरम पाण्यात ग्लोव्हज भिजवावे नंतर धुवावे.

- Advertisement -

ज्या बेडवर तुम्ही झोपता. अंगावर जी चादर पांघरता . जी उशी घेता त्यावरील कव्हरवरही कोरोना व्हायरस असू शकतो. यामुळे रोजच्या रोज चादरी व उशांचे कव्हर धुऊन काढावीत.

घरातील कार्पेट किंवा दरवाजाबाहेरील डोअर मॅटच्या माध्यमातूनही कोरोना चपला व बूटांच्या माध्यमाने घरात पोहचू शकतो. त्यामुळे त्यांच्याही स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.

रोज तुम्ही जे कपडे घालून बाहेर जाता त्यावरही कोरोना व्हायरस असू शकतो. यामुळे बाहेरून आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवावे व नंतर साबणाने धुऊन काढावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -