घरदेश-विदेशचीन सरकारशी पंगा घेणे जॅक मा यांना पडले भारी

चीन सरकारशी पंगा घेणे जॅक मा यांना पडले भारी

Subscribe

जॅक मा यांच्या संपत्तीत मोठी घसरण

जगप्रसिद्ध अब्जाधीश चीनी उद्योगपती म्हणून जॅक मा यांची ओळख आहे. अलीबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांची जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना केली जाते. मात्र चीन सरकारविरोधी वक्तव्यामुळे जॅक मा अडचणीत सापडले आहे. चिनी रेग्युलेटर्सच्या कारवाईनंतर जॅक मा यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. जॅक मा श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहचले आहेत. त्याचबरोबर चीन सरकारने आता जॅक मा यांच्या उद्योग समुहावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

चीनच्या अब्जाधिश लोकांच्या हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2019 आणि 2020 प्रमाणे जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबियांची चीनमध्ये सर्वाधिक संपत्ती होती. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या संपत्ती मोठ्याप्रमाणात घसरण होत ती चौथ्या स्थानी पोहचली आहे. त्यामुळे जॅक मा यांच्या जागी आता मिनरल वॉटर कंपनी नोनग्फूचे मालक झोंग शानशान, टेन्सेंट कंपनीचे पोनी मा आणि ई-कॉमर्स कंपनीचे पिनडूओडुओचे मालक कोलिन हुआंग हे वरच्या स्थानी पोहचले आहेत.
(China Under government scrutiny Jack Ma not chinas richest man anymore)

- Advertisement -

त्यामुळे चीनविरोधी वक्तव्य जॅक मा यांना चांगलेच भोवले आहे. जॅक मा यांनी 24 ऑक्टोबर 2020 रोजी बीजिंगमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात वादग्रस्त भाषण केले. यावेळी चीनच्या नियामक प्रणाली भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच चीनच्या बँकिंग व्यवस्थेवरही टीका केली. त्याचबरोबर चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या भाषणापासूनच जॅक मा यांच्या उद्योग साम्राज्याला चीन सरकारकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वॉल स्‍ट्रिट जनरलच्या माहितीनुसार, जॅक मा यांच्या अँट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्याचा आदेश चिनीचे राष्‍ट्रपती शी जिनपिंग यांच्याकडूनच देण्यात आले. तर क्रिसमसदरम्यान जॅक मा यांच्या अलिबाबा गृपविरोधातील चौकशी पूर्ण होत नाही, तोवर जॅक मा यांना देशाबाहेर जाऊ देऊ नका असा आदेशही देण्यात आला होता. या कारवाईनंतर जॅक मा अगदी कमी वेळा सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. कहर म्हणजे चीन सरकारने त्यांना गायब केल्याच्याही बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या. चीनमध्ये रेग्युलेटरी नियमांवर टीका करणाऱ्या उद्योजकांवर सातत्याने कारवाई केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा- न्यायाधिशांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने वकिलाला झाली जेल

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -