घरदेश-विदेशमोहम्मद शमीच्या अटक वॉरंटला स्थगिती

मोहम्मद शमीच्या अटक वॉरंटला स्थगिती

Subscribe

पश्चिम बंगालच्या जिल्हा कोर्टाने मोहम्मद शमीच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. पश्चिम बंगालच्या एका जिल्हा न्यायालयाने त्याच्या अटक वारंटला स्थगिती दिली आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. या आरोपाखाली गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने शमी आणि त्याचा भाऊ हसीन अहमदच्या विरोधात अटक वारंट जारी केले होते. तसेच कोर्टाने त्यांना आत्मसमर्पणासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला होता. या कालावधीत शमी दामिनासाठी अर्ज करु शकतात, असेही कोर्टाने नमूद केले होते. दरम्यान, कोर्टाने शमीच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती शमीचे वकील सलीम रहमान यांनी दिली आहे.

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

गेल्या एक वर्षांपासून मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरु आहे. हसीनने आपल्या पतीवर विवाहबाह्य संबंध, मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. सोशल मीडियावर शमीने केलेल्या चॅटचे फोटो टाकून हसीनने खळबळ उडवून दिली होती. शिवाय, मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंगचा देखील आरोप केला होता. त्यामुळे दोघे पती-पत्नी चांगले चर्चेत आले होते. हसीनने कोर्टामध्ये आपल्या पतीकडून मुलीच्या आणि स्वत:च्या खर्चासाठी दरमहा १० लाख रुपये मिळावे, अशी मागणी केली होती. हसीन जहॉंने केलेल्या आरोपांची तपासणी पोलिसांकडून केली जात होती. यानंतर आता कोलकाता पोलिसांकडून मोहम्मद शमीच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाकडून गेल्या आठवड्यात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. हे अटक वॉरंट कोर्टाकडून स्थगित करण्यात आले.


हेही वाचा – शमीच्या मदतीला बीसीसीआय धावली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -