घरदेश-विदेशकाँग्रेस नेत्या अलका लांबांची घरवापसी, आपला केला रामराम!

काँग्रेस नेत्या अलका लांबांची घरवापसी, आपला केला रामराम!

Subscribe

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला असून अलका लांबा यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

काही वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षामध्ये सामील झालेल्या दिल्लीच्या माजी आमदार अलका लांबा यांची घरवापसी झाली आहे. अलका लांबा यांनी शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको आणि इतर ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश झाला. पी. सी. चाको हे दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. यावेळी काढण्यात आलेला फोटो अलका लांबा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये अलका लांबा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाची चिट्ठी दाखवताना दिसत आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला हा मोठा झटका मानला जात आहे.

- Advertisement -

लांबांचा आप विरोध

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अलका लांबा यांनी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा प्रचार करण्यास नकार दिला होता. त्यावरून त्यांचे आपमधील नेतेमंडळींशी संबंध ताणले गेले होते. सप्टेंबर महिन्यामध्ये अलका लांबा यांच्यावर विधानसभेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांची आमदारकी अवैध ठरवण्यात आली होती. त्यानंतर अलका लांबा यांनी ट्वीटरवर आगपाखड करत आपण आपच्या सर्व पदांचं काम थांबवत असल्याचं जाहीर केलं होतं. काही महिन्यांपूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला भारतरत्न परत घेण्यासंदर्भातलं विधेयक दिल्ली विधानसभेनं काही दिवसांपूर्वी मंजूर केलं. त्या विधेयकाला पाठिंबा देण्यासंदर्भात पक्षाकडून लांबा यांना आदेश देण्यात आले होते. मात्र, त्याला अलका लांबा यांनी विरोध केला. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

अपक्ष नव्हे, काँग्रेसच!

दरम्यान, आपमधून बाहेर पडल्यानंतर अलका लांबा दिल्लीत होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुका अपक्ष लढवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा हात हातात घेतल्यामुळे आपसाठी दिल्लीमध्ये नवी चिंता उभी राहिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -