घरCORONA UPDATEसर्व सामान्यांना 'या' दिवशी मिळणार Sputnik V लस, जाणून घ्या किंमत

सर्व सामान्यांना ‘या’ दिवशी मिळणार Sputnik V लस, जाणून घ्या किंमत

Subscribe

अपोलो रुग्णालयाने सांगितल्यानुसार, २० जूनपासून सर्वसामान्यांसाठी Sputnik V लस उपलब्ध होणार आहे.

देशात आपत्कानील वापरासाठी मान्यता मिळालेली रशियाची स्पुतनिक व्ही (Sputnik V) लस सर्वसमान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. राजधानी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात (Apolo Hospital) रविवारी Sputnik V लसी देण्यात आली आहे. Sputnik V लसीला प्रशासित करणारे अपोलो हे शहरातील पहिले रुग्णालय ठरले आहे. रविवारी अपोलो रुग्णालयात १७० सदस्यांना Sputnik V लस देण्यात आली. अपोलो रुग्णालयाने सांगितल्यानुसार, २० जूनपासून सर्वसामान्यांसाठी Sputnik V लस उपलब्ध होणार आहे. डॉ. रेड्डी लॅबरेटोरीच्या कर्मचाऱ्यांना देखील लस देण्यात आली आहे. भविष्यात लागणाऱ्या ५०० हून अधिक लसींचे डोस रुग्णालयात आले आहे आणि लवकरच आणखी लसींचे डोस येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. (All common people will get Sputnik V vaccine on 20 June, know the price)

Sputnik V लसीची किंमत काय?

केंद्र सरकारच्या नवीनतम मूल्य निर्धारणाच्या नियमांनुसार, Sputnik V लसीची किंमत १ हजार १४५ रुपये असणार आहे. ज्यात रुग्णालयाचे शुल्क आणि कराचा समावेश असणार आहे. याआधीही अपोलो रुग्णालयात लसी देण्यात आल्या. त्या लसींच्या एका डोसची किंमत १ हजार २५० रुपये इतकी होती. पुढील काळात लसींच्या किंमती कमी केल्या जातील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

अपोलो रुग्णालयासोबतच मधुकर रेनबो चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्येही Sputnik Vलस उपलब्ध होणार आहे. Sputnik V लस घेण्यासाठी नागरिकांना पहिल्यांदा कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. Sputnik Vलसीला देशात आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर भारतात डॉ. रेड्डीज लॅबरोटेरिज Sputnik Vलसीचे उत्पादन करत आहे. हैद्राबाद आणि विशाकापट्टणम येथील प्लॅटमध्ये ही लस तयार करण्यात येत आहे.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटला ओळखण्यासाठी महाराष्ट्रातून नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -