घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटअफगाणिस्तानमधल्या युवतींनी बनवला सर्वात स्वस्त व्हेंटिलेटर!

अफगाणिस्तानमधल्या युवतींनी बनवला सर्वात स्वस्त व्हेंटिलेटर!

Subscribe

आखाती देश म्हटलं की अस्थिरता आणि अराजक हीच परिस्थिती आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागते. पण याच आखाती देशांची दुसरी विकासाची आणि सकारात्मक बदलांची देखील एक बाजू आहे. तीच बाजू अफगाणिस्तानमधल्या काही युवतींनी जगासमोर आणली आहे. पूर्व अफगाणिस्तानमधल्या हेरात शहरातल्या एका मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयातल्या युवतींनी जगातला सर्वात स्वस्त व्हेंटिलेटर बनवला आहे. या महाविद्यालयातल्या एकूण ७ विद्यार्थिनींनी हा व्हेंटिलेटर बनवला असून त्याची किंमत जागतिक स्तरावर ७०० डॉलर अर्थात जवळपास ५० हजार रुपयांपर्यंत या व्हेंटिलेटरची किंमत होते. जागतिक स्तराच्या व्हेंटिलेटर्सपैकी हा व्हेंटिलेटर सर्वात स्वस्त आहे. या श्रेणीतल्या इतर व्हेंटिलेटर्सची किंमत २० हजार डॉलर्सच्या घरात आहे.

४ महिन्यांच्या प्रयत्नांनंतर तयार झाला व्हेंटिलेटर

ऑल फीमेल अफगाण रोबोटिक्स टीमच्या या विद्यार्थिनींच्या या प्रकल्पासाठी आणि त्यांच्या इतरही अनेक रोबोटिक्स प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. सध्या त्यांनी बनवलेल्या स्वस्त व्हेंटिलेटर्सवर मार्च महिन्यापासून काम सुरू केलं होतं. ४ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर हा व्हेंटिलेटर तयार झाला आहे. मेसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (MIT) आणि हार्वर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थिनींनी तयार केला आहे. या व्हेंटिलेटरची बॅटरी १० तासांपर्यंत चालू शकते. शिवाय, तो हातात उचलून नेण्यासाठी देखील सोपा असल्याचं या विद्यार्थिनींच्या गटाचं म्हणणं आहे.

- Advertisement -

दरम्यान, या व्हेंटिलेटरची अफगाणिस्तानच्या स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून चाचणी होणं अद्याप बाकी आहे. मात्र, संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये एकूण ८०० व्हेंटिलेटर्स आहेत. पण त्या तुलनेत अफगाणिस्तानमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. आजघडीला अफगाणिस्तानमध्ये ३५ हजार ५०० कोरोना रुग्ण आहेत, तर १ हजार १८१ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थिनींनी बनवलेल्या स्वस्त व्हेंटिलेटरचं स्थानिक प्रशासनाकडून देखील स्वागत करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -