युरोपमधील तापमानात प्रचंड वाढ; WHO कडून गाइडलाइन्‍स जारी

युरोपीय देशांमध्ये मागील काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल, इटली आणि तुर्कस्तानला उष्णतेचा तडाखा बसला आहे. या देशांमध्ये उष्णतेने सर्व विक्रम मोडले आहेत.

युरोपीय देशांमध्ये मागील काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल, इटली आणि तुर्कस्तानला उष्णतेचा तडाखा बसला आहे. या देशांमध्ये उष्णतेने सर्व विक्रम मोडले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. (all heat records broken in european countries know what is cause of heatwave who issued guidelines in marathi)

कडक उन्हामुळे रेल्वेची चाकेही वितळली आहेत. तसेच, उष्णतेमुळे रेल्वेचे सिग्नलही वितळत आहेत. त्यामुळे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. शिवाय युरोपमधील देशांमध्ये अचानक उकाडा का वाढला याची माहितीही समोर आली आहे.

वाढत्या उष्णतेमुळे जागतिक आरोग्य संघटनेने युरोपमधील देशांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, घराबाहेरील उद्यानात मुले आणि जनावरांना परवानगी नाही. एखादी व्यक्ती आजाराने ग्रासलेली असेल किंवा कोणतीही औषधे घेत असेल, तर त्यांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

जागतिक हवामान संघटनेच्या मते, आफ्रिकेतून येणारी उष्ण हवा आणि भारत, पाकिस्तान, मध्य पूर्व आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागांमध्ये तीव्र उष्णता असल्याने युरोपमधील उष्णता वाढत आहे. तसेच, वाढत्या जागतिक तापमानामुळे उष्णतेच्या लाटेची समस्या निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 2019 मध्ये युरोपमध्ये अशाच प्रकारे उष्णतेच्या लाटेची समस्या निर्माण झाली होती.

काही शास्त्रज्ञांच्या मते या उष्णतेत वाढ हवामानातील बदलांमुळे होत आहे. हवामान बदलामुळे अलिकडच्या काळात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान “स्पेन आणि पोर्तुगालमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत 1,700 लोकांचा मृत्यू झाला आहे”, असे डब्ल्यूएचओचे युरोपचे प्रादेशिक संचालक हॅन्स क्लुगे यांनी सांगितले.

दरम्यान शिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे लागलेली आग दक्षिण युरोपपासून उत्तरेकडील स्कँडिनेव्हियापर्यंत पसरली आहे. हवामान बदलावरील जागतिक पॅरिस कराराची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारांनी राजकीय इच्छाशक्ती आणि खऱ्या नेतृत्वाचे प्रदर्शन करणे आवश्यक आहे. या आठवड्यातील घटना हवामान बदलाचा प्रभावीपणे सामना करण्याची नितांत गरज दर्शवतात. आपल्या काळातील हे व्यापक संकट आहे ज्यामुळे वैयक्तिक आरोग्य आणि मानवतेचे अस्तित्व दोन्ही धोक्यात आले आहे.


हेही वाचा – ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री ‘पार्थ चॅटर्जी’ यांना ईडीकडून अटक