नवी दिल्ली : नवीन वर्ष सुरू व्हायला अवघा एक दिवस बाकी आहे. यानिमित्त जगभरात सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. आणि यात सर्वांचाच सारखा सहभाग आहे. मात्र, या नवीन वर्षाच्या स्वागतात सहभागी होऊ नका, असे आदेश मुसलमान समाजाला देण्यात आले आहेत. (all india muslim jamaat issues fatwa regarding new year celebrations)
ऑल इंडिया मुस्लिम जमात कडून यासंदर्भात फतवा जारी करण्यात आला आहे. याअंतर्गत मुस्लिम समाजाला नवीन वर्षाच्या स्वागतात सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुस्लिम समाजातील जे तरुण – तरुणी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करतात, त्यांच्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रजवी बरेलवी यांचे म्हणणे आहे की, हे इंग्रजी वर्ष साजरे करणे ही काही गर्वाची गोष्ट नाही.
हेही वाचा – Suresh Dhas VS Prajakta Mali : अखेर धस नरमले…प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी
ऑल इंडिया मुस्लिम जमात संघटनेकडून काढण्यात आलेल्या या फतव्यानुसार मुसलमान तरुण तरुणींना नवीन वर्ष साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ सेलिब्रेशन करण्यालाच बंदी आहे, असे नव्हे तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासही बंदी करण्यात आली आहे. न्यू ईअर ही इंग्रजी नववर्षाची सुरुवात आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या फतव्यात मुस्लिम समाजाने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होऊ नये, याचे आवाहन केले आहे. रजवी म्हणाले की, तरुण – तरुणींना नवीन वर्ष साजरे न करण्यास सांगण्यात आले आहे. नवीन वर्ष ही काही गर्वाची बाब नाही, त्यामुळे त्याचे स्वागत करण्याची काहीही गरज नाही, अशा कानपिचक्या जे तरुण – तरुणी हे स्वागत करतात, त्यांना देण्यात आल्या आहेत.
अशा कोणत्याही गैरधार्मिक गोष्टी मुसलमानांसाठी निषिद्ध आहेत. त्यामुळे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यापेक्षा मुसलमानांनी धार्मिक कामात योगदान द्यायला हवे, असेही रिजवी म्हणाले.
हेही वाचा – Supreme Court Collegium : न्यायाधीश म्हणून नातेवाईकांना प्राधान्य नको; नियुक्त्यांसंदर्भात कॉलेजिअम गंभीर
सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटेनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकाची विक्री भारतात होत असल्याबद्दल मुस्लिम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने यावर बंदी घालावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. जमीयत उलमा – ए – हिंदच्या उत्तर प्रदेश विभागाचे कायदेशीर सल्लागार मौलाना काब रशीदी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे जर दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जात असतील, तर तो कायद्याच्या दृष्टीने अपराध आहे. सलमान रश्दी यांचे हे पुस्तक असेच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली यात अनेक वादग्रस्त गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यघटनेच्या मूळ कल्पनेच्या हे विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar