घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : पर्यटकांना १५ एप्रिलपर्यंत भारतात येण्यास बंदी

करोना व्हायरस : पर्यटकांना १५ एप्रिलपर्यंत भारतात येण्यास बंदी

Subscribe

चीनमधून सगळीकडे पसरत असलेला करोना व्हायरस भारतात आणखी पसरु नये, यासाठी आता खबरदारी घेत पर्यटकांना १५ एप्रिलपर्यंत भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जगभरात करोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहे. या करोनामुळे चीनमध्ये आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच हा व्हायरस आता महाराष्ट्रात येऊन धडकला आहे. महाराष्ट्रातील संख्या आता १० वर गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे चीनमधून सगळीकडे पसरत असलेला हा आजार भारतात आणखी पसरु नये, यासाठी आता खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान, परदेशी नागरिकांना येत्या १५ एप्रिलपर्यंत भारतात येण्यास बंदी घालण्यात आली असून सरकारने व्हिजाना स्थगिती दिली आहे.

राज्यात करोनाचे ११ रुग्ण

राज्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११ झाली असून त्यापैकी आठजण पुण्यात तर मुंबईत दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर नागपूरमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

मुंबईत करोनासदृश्य सहा संशयित रुग्णांपैकी दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कस्तुरबा हॉस्पिटलच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेत ही चाचणी करण्यात आली. दुबईतून परतलेल्या ‘त्या’ करोनाग्रस्त दाम्पत्याच्या संपर्कात हे दोन रुग्ण आले होते. दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील २ प्रवासी दोन दिवसांपूर्वी करोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू असून या रुग्णांसोबत मुंबईतील २ सहप्रवासी देखील करोना बाधित असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे. ११ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १ हजार १९५ विमानांमधील १ लाख ३८ हजार ९६८ प्रवाशांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – ‘हे’ उपाय करा आणि करोना व्हायरस रोखा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -