सर्वोच्च न्यायालयात आज ‘महिलाराज’; ‘या’ प्रकरणांवर केवळ महिला न्यायाधीशांचे खंडपीठच करणार सुनावणी

all woman bench to hear matrimonial and bail matters in supreme court

सर्वोच्च न्यायालयात महिला राज पाहायला मिळत आहे. आज सुप्रीम कोर्टात वैवाहिक वाद आणि जामीन प्रकरणांची सुनावणी फक्त महिला न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होत आहे. यासाठी मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाची स्थापना केली आहे.

महिलांचे हे खंडपीठ वैवाहिक विवाद आणि जामीन हस्तांतरित प्रकरणांची सुनावणी करेल. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात ही तिसरी वेळ आहे. जेव्हा केवळ महिला न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. दोन्ही महिला न्यायमूर्तींच्या या खंडपीठावर सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या खोली क्रमांक 11 मध्ये सुनावणी सुरु आहे. केवळ महिला न्यायाधीशांच्या या खंडपीठासमोर 32 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. वैवाहिक विवादांच्या 10 हस्तांतरित प्रकरणांसह सुनावणी सुरु झाली, यानंतर जामीन आणि इतर 10 प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात 2013 पहिल्या महिला खंडपीठाची स्थापना करण्यात आली होती, यावेळी न्यायमूर्ती ज्ञानसुधा मिश्रा आणि न्यायमूर्ती रंजना प्रकास देसाई यांच्या खंडपीठाची स्थापना करण्यात आली. यानंतर 2018 मध्ये न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाची स्थापना करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात सध्या तीन महिला न्यायाधीश आहेत. यामध्ये न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती बीव्ही नगररत्न आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांचा समावेश आहे.

2027 मध्ये नागरत्न बनणार देशातील पहिल्या महिला सीजेआय

न्यायमूर्ती बीव्ही नागरत्न 2027 मध्ये देशाच्या पहिल्या महिला सीजेआय होतील. सर्वोच्च न्यायालयात सध्या सीजेआयसह 27 न्यायाधीश कार्यरत आहेत. ज्यात स्वीकृत पदांची संख्या ही 34 आहे.

कॉलेजियमच्या शिफारशींवरून वाद

दरम्यान, कॉलेजियमच्या शिफारशींनुसार न्यायाधीशांच्या नियुक्त्या न करण्यावरून सर्वोच्च न्यायालय आणि सरकारमध्ये खडाजंगी सुरूच आहे. नियुक्तीच्या फायली रोखल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


अरविंद केजरीवालांच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट; आपच्या नेत्यांचे मोबाईल चोरीला