घरदेश-विदेशगाईला राष्ट्रीय पशू घोषित करा ! अलाहाबाद हायकोर्टाची केंद्राला सूचना

गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा ! अलाहाबाद हायकोर्टाची केंद्राला सूचना

Subscribe

गोरक्षणाला हिंदूंचा मूलभूत अधिकार बनवले पाहिजे.

गाय ही भारताची संस्कृती आहे. संस्कृतीचे रक्षण करणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मग तो कुठल्याही धर्माचा का असेना. गोरक्षा आणि त्याला प्रोत्साहन देणे हे कुठल्याही धर्माशी जुळलेले नाही, अशी टिप्पणी करतानाच गाईला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची सूचना अलाहाबाद हायकोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान केद्र सरकारला केली. गोहत्येच्या आरोपीचा जामीन फेटाळताना न्यायमूर्ती शेखर यादव हे निर्देश दिले.

अलाहाबाद हायकोर्टात एका जामीन याचिकेवर सुनावणी झाली. गायीला राष्ट्रीय पशु घोषित केले पाहिजे. गोरक्षणाला हिंदूंचा मूलभूत अधिकार बनवले पाहिजे. गोहत्येचा आरोपी जावेदची जामीन याचिका फेटाळताना न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले आहे. ’गोरक्षा आणि त्याला प्रोत्साहन देणे हे कुठल्याही धर्माशी जुळलेले नाही. गाय ही भारताची संस्कृती आहे. संस्कृतीचे रक्षण करणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असेना’, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

- Advertisement -

जेव्हा एखाद्या देशाची संस्कृती आणि श्रद्धेला ठेच पोहोचते तेव्हा तो देश कमकुवत होतो. आरोपींनी यापूर्वीही गोहत्या केली होती. यामुळे समाजातील सौहार्द बिघडले होते. जर आरोपीला जामीन मिळाला तर तो पुन्हा हा गुन्हा करेल आणि समाजाचे वातावरण बिघडवेल, असेगोहत्येच्या आरोपीची जामीन याचिका फेटाळून न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

गायीला राष्ट्रीय प्राणी पशु म्हणून घोषित करण्याची सूचना अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र सरकारला केली आहे. संसदेत विधेयक आणून केंद्र सरकारने गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा द्यावा, असेही कोर्टाने म्हटले आहे. गायीसंदर्भात संसदेने बनवलेल्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे, असेही कोर्टाने स्पष्ट केले.

- Advertisement -

फक्त हिंदुंनाच गायीचे महत्त्व माहिती आहे, असं नाही. मुस्लिम शासकांनीही आपल्या कार्यकाळात भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजले होते. ५ मुस्लिम शासकांच्या सत्तेत गोहत्येला बंदी होती. बाबर, हुमायूं आणि अकबराने आपल्या सणांमध्ये गोहत्येवर बंदी घातली होती. म्हैसूरचे नवाब हैदर अली यांनी गोहत्या हा गुन्हा घोषित केला होता, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -