घरदेश-विदेशअलाहाबाद विद्यापीठात विद्यार्थी- सुरक्षारक्षक भिडले; जाळपोळ, गोळीबार

अलाहाबाद विद्यापीठात विद्यार्थी- सुरक्षारक्षक भिडले; जाळपोळ, गोळीबार

Subscribe

विद्यार्थी संघटनेच्या पुनर्स्थापनेबाबत येथे विद्यार्थांचे आंदोलन सुरु आहे. सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थ्यांनी संघटनेच्या इमारतीचे कुलुप उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन वादाची ठिणगी पडली. विद्यार्थी व सुरक्षारक्षकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामध्ये माजी विद्यार्थी विवेकानंद पाठक यासह अनेक विद्यार्थी जखमी झाले. काही विद्यार्थींनी विद्यापीठ संकुलात तोडफोड केली. वाहनांची जाळपोळ केली. सुरक्षारक्षकांनी गोळीबार केल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. 

अलाहाबादः अलाहाबाद विद्यापीठात विद्यार्थी व सुरक्षारक्षकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका शिगेला पोहोचला की विद्यार्थी व सुरक्षारक्षकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमा झाले. त्यामुळे येथे मोठ्या संंख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

विद्यार्थी संघटनेच्या पुनर्स्थापनेबाबत येथे विद्यार्थांचे आंदोलन सुरु आहे. सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थ्यांनी संघटनेच्या इमारतीचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन वादाची ठिणगी पडली. विद्यार्थी व सुरक्षारक्षकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामध्ये माजी विद्यार्थी विवेकानंद पाठक यासह अनेक विद्यार्थी जखमी झाले. काही विद्यार्थींनी विद्यापीठ संकुलात तोडफोड केली. वाहनांची जाळपोळ केली. सुरक्षारक्षकांनी गोळीबार केल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विटा व दगडफेक करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी थांबवण्याचे काम केले. तरीही काही विद्यार्थी आक्रमक होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

विद्यापाठीमंध्ये विद्यार्थी आक्रमक झाल्याची ही काही पहिली घटना नाही. जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटना नेहमीच आक्रमक असतात. येथील विद्यार्थी संघटनांमधून अनेक राजकीय नेते जन्माला आले आहेत. नुकताच जेएनयूच्या भितींवर ब्राम्हणांबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -