घरदेश-विदेशउत्तरप्रदेश, बिहारमध्ये भाजपचा पराभव शक्य - राहुल गांधी

उत्तरप्रदेश, बिहारमध्ये भाजपचा पराभव शक्य – राहुल गांधी

Subscribe

आघाडी झाल्यास भाजपचा पराभव शक्य असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आज ( शुक्रवारी ) लंडनच्या स्ट्रॅटजिक स्टडीज इन्स्टिट्यूटमध्ये ते बोलत होते.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१९च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी भाजपला लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झाली. त्याचप्रमाणे बिहारमध्ये देखील आघाडी झाली तर भाजपला १२० जागांवर फटका बसेल असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आज ( शुक्रवारी ) लंडनच्या स्ट्रॅटजिक स्टडीज इन्स्टिट्यूटमध्ये ते बोलत होते. त्यामुळे आगामी काळामध्ये राजकारणाची समीकरणं वेगानं बदलतील असे म्हणायला काहीच हरकत नाही. यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील लक्ष्य केले. दरम्यान, अरब जगतात मुस्लिम ब्रदरहूडची जी विचारसरणी आहे त्याचप्रमाणे भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असल्याची टीका राहुल गांधी यावेळी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला मुळ स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करत आहे. अन्य पक्षांनी केव्हाही भारतातील संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. असे देखील राहुल गांधी म्हणाले.

सर्जिकल स्ट्राईक आणि एनआरसीची

दरम्यान, लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल कोणतेही दुमत नाही. आसाममध्ये एनआरसीची सुरूवात करणे ही आमचीच कल्पना होती. शिवाय, आम्ही ती केली देखील. तर, एनआरसीची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची हा कळीचा मुद्दा आहे. एनआरसीच्या यादीत समावेश न केलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यावसायिकांना भरपूर अपेक्षा होत्या. पण त्यांच्या पदरी निराशाच आली. तर, भारतीय व्यावसायिकांवर सीबीआय आणि ईडीचा मोठा दबाव असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला.

- Advertisement -

…तर भाजपचा पराभव शक्य

समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास भाजपचा पराभव शक्य असल्याचे राहुल गांधी यांनी यापूर्वी देखील म्हटले आहे. तसेच, लोकसभेमध्ये देखील राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. राफेल करार, जीएसटी सारख्या मुद्यांना पकडून राहुल गांधी सध्या भाजपवर जोरदार प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.

वाचा – बहुचर्चित राफेल विमान खरेदीचा करार का महत्त्वाचा?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -