Homeक्राइमAllu Arjun Bail Granted : अल्लू अर्जुनला वाचवण्यासाठी वकिलांकडून शाहरुखच्या जुन्या केसचा...

Allu Arjun Bail Granted : अल्लू अर्जुनला वाचवण्यासाठी वकिलांकडून शाहरुखच्या जुन्या केसचा दाखला

Subscribe

पुष्पा 2 च्या एका प्रीमियर दरम्यान अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याला जामीन मिळाला. याचे कारण म्हणजे अल्लू अर्जुनच्या वकिलांनी बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानच्या जुन्या केसचा दाखला सुनावणीदरम्यान दिला.

नवी दिल्ली : दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित ‘पुष्पा 2’ हा चित्रपट नुकताच देशभर प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. मात्र पुष्पा 2 च्या एका प्रीमियर दरम्यान अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर त्याला न्यायालायने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र पुढील काही तासातच अल्लू अर्जुनला जामीन मिळाला. याचे कारण म्हणजे अल्लू अर्जुनच्या वकिलांनी बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानच्या जुन्या केसचा दाखला सुनावणीदरम्यान दिला. (Allu Arjun’s lawyers cited Shahrukh Khan’s old case to get bail)

अल्लू अर्जुनचा बहुचर्चित पुष्पा 2 हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होण्याआधी एका प्रीमियरचे 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या या चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. मात्र यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय एम. रेवती या महिलेचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला होता. तसेच तिचा मुलगाही जखमी झाला होता. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत महिलेच्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

अल्लू अर्जुनला सदर बातमी कळल्यानंतर त्याने मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र सदर घटनेनंतर 5 डिसेंबर रोजी अभिनेता अल्लू अर्जुन, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि चित्रपट व्यवस्थापनाविरोधात चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायानयाने आज अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर पुढील काही तासातच अल्लू अर्जुनला जामीन देखील मिळाला.

हेही वाचा – Spy Girls Of 2025: स्पाय युनिव्हर्ससाठी आलिया भट्ट आणि कियारा आडवाणी झाल्या सज्ज!

- Advertisement -

अल्लू अर्जुनच्या वकिलांनी काय केला युक्तीवाद?

अल्लू अर्जुनचे वकील निरंजन रेड्डी आणि अशोक रेड्डी यांनी त्याच्या अटकेप्रकरणी सोमवारपर्यंत स्थगितीची मागणी करताना शाहरुख खानशी संबंधित एका घटनेची न्यायालयाला आठवण करून दिली. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, अल्लू अर्जुनचे वकील म्हणाले की, 2017 मध्ये ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वडोदरा स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत शाहरुख खानच्या एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शाहरुख खानला दिलासा दिला होता. त्यामुळे अल्लू अर्जुनलाही दिलासा द्यावा, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली. यानंतर न्यायालयाने  अल्लू अर्जुनला जामीन दिला.

शाहरुखचे प्रकरण काय?

दरम्यान, 23 जानेवारी 2017 रोजी शाहरुख खानने त्याच्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबई ते दिल्ली ट्रेनने प्रवास केला होता. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी वडोदरा स्टेशनवर मोठ्या संख्येने चाहते जमले होते. मात्र परिस्थिती बिघडली आणि चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे 45 वर्षीय फरदीन खान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. यानंतर जितेंद्र सोलंकी यांनी फरदीन खान यांच्या मृत्यूसाठी शाहरुख खानला जबाबदार धरत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र शाहरुखने चेंगराचेंगरीला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन दिले नसून, मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे मान्य करत न्यायालयाने शाहरुख खानची निर्दोष मुक्तता केली होती.

हेही वाचा – CID : पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास CID टीम सज्ज


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -